हत्तीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात ज्यामध्ये हत्तीची वेगवेगळी रुपे पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी चित्र काढणाऱ्या हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यानंतर एका हत्तीने पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान आता आणखी एक हत्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हत्ती एका व्यक्तीला सोंडेने हवेत भिरकावताना दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, हत्तीच्या खूप जवळ जाणे तरुणाला फारच महाग पडले आहे.
व्हायरल व्हिडि @vikram_sir_saralganit इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केलेला, व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तीसह मैत्री करण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. एक तरुण हत्तीला झाडाचा पाला खायला देतो. हत्ती देखील सोंडेने ते घेऊन खातो. त्यानंतर तरुणाला वाटते की हत्ती त्याला काही करणार नाही त्यामुळे तो हत्तीला हात लावण्याचे प्रयत्न करतो. पण पुढच्या क्षणी हत्ती तरुणाला सोंडेने जोरात ढकलतो. त्यामुळे तरुण हवेत उडून जमिनीवर पडतो. हा धक्कादायक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहताना अचानक हत्तीची ही प्रतिक्रिया पाहून अंगावर काटा येतो.
हेही वाचा – लिएंडर पेस आहे डान्सर? चिमुकलीची गोंडस चूक पाहून दिग्गज खेळाडू म्हणाला, “अफवा खरी आहे”
व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सावध राहा! कोणत्याही प्राण्याच्या जास्त जवळ जाऊ नका. हा व्हिडीओ फक्त लोकांना सजग करण्यासाठी पोस्ट केला आहे. हा व्यक्ती माझ्या ओळखीतील आहे आणि आता त्याची तब्येत एकदम चांगली आहे”
या व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये वादाविवाद सुरु झाला एकाने विनोदीपणे टोमणा मारला, “हत्ती म्हणत असेल की, २ रुपयाचे गवक खायला देऊ मालक बनू पाहत आहे . दुसऱ्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले, “वन्य प्राण्यांना एकटे सोडा.”
अनेक वापरकर्त्यांनी प्राण्यांचे वर्तन समजून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला, एकाने सल्ला दिला, “जेव्हा हत्तीची शेपटी हलत असेल तेव्हा त्याच्या जवळ जाऊ नका. त्याला धोका वाटतो.” विविध प्रतिक्रियांमधून, मानवी जबाबदारीची भावना निर्माण झाली.
व्हिडीओ वन्य प्राण्यांशी संवाद साधताना संभाव्य धोक्यांबद्दल सावधगिरीचे बाळगण्याची आठवण करू देत आहे तरी काहींनी दिलासा व्यक्त केला की, हत्तीच्या आक्रमकतेमुळे अधिक गंभीर परिणाम झाले नाहीत.