स्ट्रीट फूड खाणं प्रत्येकालाच आवडते. त्यामध्येच पाणीपुरी म्हटलं की अनेकांचा जीव की प्राण. आंबट गोड चवीची चटकदार पाणीपुरी प्रत्येकजण अगदी आवडीने खातो. तुम्ही अनेकदा दुकानांत, स्टॉलवर, मॉलमध्ये पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी पाहिली असेल. पण, या गर्दीत तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.

या रंजक व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हत्ती पाणीपुरी खाताना दिसत आहे. तेही रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडी हूबेहूब माणसांसारखं? आम्हाला माहित आहे की यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सध्या सोशल मीडियावर हत्तीच्या अशाच एका व्हिडीओने लोकांचं लक्ष वेधून घेतले आहे, ज्याने लोक हैराण झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये हत्ती एकामागून एक पाणीपुरी खाताना दिसत आहे.

केळी आणि उसाचे शौकीन असलेल्या हत्तीला आता पाणीपुरीही आवडू लागली आहे, हे आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आसाममधील तेजपूरचा आहे. रस्त्याच्या कडेला विक्रेत्याजवळ हत्ती उभा आहे आणि दणादण पाणीपुरी खातोय. पाणीपुरी विकणारा व्यक्ती पाणीपुरी हत्तीच्या सोंडेत ठेवतात आणि नंतर हत्ती मोठ्या चवीने खात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. चला तर मग पाहूया हा मजेदार व्हिडीओ.

आणखी वाचा : २६० वर्ष जुन्या सोन्याच्या रथात बसून Charles III राज्याभिषेकासाठी जाणार, जाणून घ्या काय आहे या रथात खास?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : वडिलांसोबतचा व्हिडीओ पाहताना भावूक झाला हा चिमुकला, पाहा VIRAL VIDEO

हत्ती पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी आले असेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर होत आहे. @kksomasekhar या हँडलवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसत आहेत.