Viral Video: आपल्या आयुष्यात कधी, कुठल्या क्षणी कोणतं संकट येईल हे सांगता येत नाही. काही जण या संकटांमधून स्वतःची सुखरूप सुटका करून घेतात, तर काही जण त्या संकटापासून दूर पळून जाऊन हार मानतात. आयुष्यातील या संकटांपासून नेहमीच कुठलीतरी शिकवण मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काहीतरी होतं, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

समाजमाध्यमांवर प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो, ज्यातील काही प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर काही प्राणी मनुष्यांवरदेखील हल्ला करताना दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Elephant charges at man after persistent teasing
Viral Video : तरुणाने काढली हत्तीची छेड, संतापलेला हत्ती अंगावर आला धावून…पाहा पुढे काय घडले!
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
elephant loksatta news
बेळगांव खानापूरमध्ये हत्ती पकड मोहीम, तर महाराष्ट्रात दोडामार्ग-चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
The elephant stopped the cub approaching the strangers
“आई तुझ्या प्रेमाची सर कशालाच नाही…” अनोळखी लोकांजवळ जाणाऱ्या पिल्लाला हत्तीने अडवलं; VIDEO पाहून नेटकरीही भारावले

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरील असून यावेळी रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या दोन व्यक्तींच्या मागे अचानक एक हत्ती लागतो. हत्ती आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच या दोन्ही व्यक्ती जोरात धावण्याचा प्रयत्न करतात. पण, यावेळी त्या दोघांपैकी एक जण खाली पडतो, तेव्हा त्याच्यावर हत्ती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका @bhavayeudehawa या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास सहा लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘जेव्हा मृत्यूची चाहूल लागते…’ लांडगा अचानक घाबरला आणि पळू लागला; पुढे त्याच्याबरोबर जे घडलं… VIDEO पाहून नेटकरीही हळहळले

पाहा व्हिडीओ:

तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “पळू शकत नाही, पण डोकं तरी वापरायाचं… हत्तीला स्वतःभोवती गोल गोल फिरता येत नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “अरे देवा, म्हणून रोज फिट राहण्यासाठी व्यायाम करायला हवा, म्हणजे जोरात पळता येईल.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “हत्तीला एवढा राग का आला?”

Story img Loader