सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यापैकी काही लगेच व्हायरल होतात आणि काही व्हिडीओंबद्दल लोकांना माहितीही नसते. खरं तर जे व्हिडीओ विशेषत्वाने चर्चिले जातात, ते खूप वेगाने व्हायरल होतात. आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात. त्यामध्ये कधी पाळीव प्राण्यांचे, तर कधी जंगली प्राण्यांचे व्हिडीओ दिसून येतात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर आश्चर्यकारक व्हिडीओंचीही कमतरता नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा वन्य प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये तुम्ही दोन प्राण्यांमध्ये संघर्ष पाहिला असेल. वन्य प्राण्यांनी अनेकदा लहान प्राण्यांना त्यांच्या शिकारीसाठी गृहीत धरलेले असते. किंवा ते त्यांना स्वतःसाठी धोका मानून त्यांची हत्या करतात. पण, सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये हत्तीने त्याच्यापेक्षा अगदी जंगली कुत्र्याबरोबर जे केले, ते पाहून तुम्ही मोठ्याने हसाल.

वास्तविक, जंगलात एक जंगली कुत्रा जमिनीवर झोपलेला असतो आणि चुकून हत्ती त्याच्यावर जाऊन आदळतो. त्यानंतर हत्ती त्या कुत्र्याची माफी मागत असल्यासारखी प्रतिक्रिया देतो. या आश्चर्यकारक व्हिडीओमध्ये काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

(हे ही वाचा : घरातील नळाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; नळाला लावलं चक्क…; अन्…पाहा Video)

खरे तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये जंगलातून एक हत्ती रस्त्याने चालताना दिसतोय. पुढे त्या रस्त्यावर काय आहे, हे त्याला माहीत नसते. त्या रस्त्यावर एक कुत्रा झोपलेला असतो. हे समोरून येणाऱ्या हत्तीला माहीत नसते. हत्ती समोरून येऊन त्या झोपलेल्या कुत्र्याला धडकतो. त्या धडकेने कुत्रा झोपेतून उठून जातो. जंगलात आढळणारा महाकाय प्राणी हत्ती दिसायला भयंकर दिसतो. परंतु, त्या हत्तीला आपली चूक लक्षात येताच तो पटकन मागे सरकतो आणि आपली सोंड वर करून तो जणू कुत्र्याची माफी मागू लागतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

Inspired By Animals नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत सहा दशलक्षांहून अधिक वेळा पाहिल्या गेलेल्या या व्हिडीओला तीन लाख ६९ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्यावर युजर्सनीही कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “या प्राण्याचे हृदय आपल्या माणसांपेक्षा मऊ आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “किती बुद्धिमान हत्ती आहे ते पाहून छान वाटले.” दुसऱ्या युजरने लिहिले, “हत्ती म्हणाला, माफ कर मित्रा; मी तुला पाहिले नाही.” युजर्सनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video elephants reaction to bumping into sleeping dog goes viral pdb
Show comments