मॅकडोनाल्ड्सने तीन दशकांपूर्वी रशियन भूमीवर स्वत: ला लॉंच केले आणि ८ मार्च रोजी, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवर आक्रमणानंतर, जागतिक फास्ट-फूड चेनने देशातील सर्व ८५० स्टोअर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणून, लोकांनी त्यांच्या आवडत्या फास्ट फूडची शेवटची चव घेण्यासाठी स्टोअरमध्ये गर्दी केली . कंपनीने हा निर्णय तात्पुरता असल्याचे जाहीर केले असूनही, चिंताग्रस्त रशियन बर्गरवर मिळविण्यासाठी लांब रांग लावून होते.

आता, रशियन लोक मॅकडोनाल्डच्या उत्पादनांवर लक्ष ठेवत आहेत. इंटरनेटवर कुठे मॅकडोनाल्डस सुरु आहे याचा मागोवा घेत आहेत. रशियन लोक स्टोअरमध्ये गर्दी करत असल्याची अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत. तिकडे खाद्यपदार्थ गगनाला भिडलेले आहेत. बर्गर, कोक, नगेट्स, फ्राईज आणि रॅप्स यांसारखे खाद्यपदार्थ वेगळे आणि जेवण म्हणून विकले जात होते.

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबानंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

आक्रमणानंतर अनेक जागतिक कंपन्यांनी रशियन बाजारपेठेतून माघार घेतली आहे. मॅकडोनाल्डच्या फास्ट-फूडच्या पदार्थांनी पूर्ण भरलेल्या रेफ्रिजरेटरचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा’

(हे ही वाचा: Pune Metro: पुणे मेट्रोतील दोन बायकांचा भांडणाचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: Video: भारत-चीन सीमेवर उणे तापमानात बर्फावर ITBP जवानांची रंगवला कबड्डीचा सामना)

सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर रशियाचे पहिले मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट १९९० मध्ये सेंट्रल मॉस्को येथे सुरू झाले.