Emotional video: सोशल मीडियावर रोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ हसवतात तर काही रडवतात; तर काही व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येत असतात. कुणी एका रात्रीत श्रीमंत होतं तर कुणी एका रात्रीत रस्त्यावर येतं. अशाच एका कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती एकेकाळी इंजिनियर होती, जी दुबईमध्ये काम करायची असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही व्यक्ती इंजिनियर असल्याचा दावा करत आहे. या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगितले असून ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्यावरून कचरा गोळा करत की रोजच्या जीवनाच्या संघर्षासाठी असल्याचे दिसत आहे.
यावेळी या व्यक्तीला जिगर रावल नावाचा सामाजिक कार्यकर्ता पाहतो आणि मदतीसाठी पुढे जातो. कार्यकर्त्याने केलेली मदत आणि विचारपूस पाहून ती व्यक्ती भावूक होते आणि व्यक्त होते. “मी एक इंजिनियर आहे, तुमच्याकडे काही खायला असेल तर मला द्या. मला आता काम मिळत नाही, पण मी एक इंजिनियर आहे आणि जुन्या चांगल्या दिवसात दुबईत होतो. मात्र, पत्नीने साथ सोडल्यानंतर गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत.’ आपल्या कुटुंबासाठी अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी परदेशात प्रवास केला आणि काम केले, परंतु इकडे त्याची पत्नी त्याला सोडून गेली आणि तो उद्ध्वस्त झाला. “आमच्या मुलांसह ती दुसऱ्या कोणासोबत गेली. मला वाटले की परदेशात जाऊन मी कमवेन आणि तिच्यासाठीही काहीतरी मिळवेन, पण इथे काहीतरी वेगळेच घडले,” असेही तो पुढे म्हणाला. यावेळी समाजिक कार्यकर्ता त्याला धीर देतो आणि मदत करतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी दरवाजावर लावलेली पाटी पाहून पोट धरुन हसाल
हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडतो, ते म्हणजे एवढं करुनही या व्यक्तीचं काय चुकलं की त्याच्यावर ही वेळ आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इन्स्टाग्रामवर १९ दशलक्षाहून अधिक दर्शकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत “काळाचा महिमा काळच जाणे” असं म्हटलंय. तर आणखी एकानं “हजारो नवऱ्यांची कहाणी, पण पुरुषांना त्यांच्या वेदना आणि दु:ख लपविण्यासाठी नेहमीच त्रास होतो”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.