जयपूरमध्ये एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७५ वर्षीय निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्याला बस कंडक्टरने तिकिटासाठी १० रुपये जास्त देण्यास नकार दिल्याने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. कंडक्टरविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झाले असे की बसने प्रवास करणाऱ्या वृद्ध आयएएस अधिकाऱ्याचा बस स्टॉप चुकला आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याला आता पुढच्या स्टॉपला उतरावे लागेल तेव्हा कंडक्टरने त्याला १० रुपये देण्यास सांगितले.

कानोटा स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) उदय सिंह यांनी सांगितले की, “निवृत्त IAS अधिकारी आर.एल. मीणा हे आग्रा रोडवरील कानोटा बस स्टँडवर उतरणार होते. परंतु, कंडक्टरने त्यांना थांब्याबद्दल माहिती दिली नाही, ज्यामुळे तो थांबा चुकला आणि नायला येथील पुढील थांब्यापर्यंत बसने प्रवास करावा लागला.

हेही वाचा – साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा –थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”

कंडक्टरने मीणा यांना पुढील बसस्टॉपपर्यंतच्या प्रवासासाठी आणखी १० रुपये मागितले, परंतु मीणा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने वाद झाला.

यानंतर, कंडक्टरने मीणाला यांना ढकलले, त्यांनी कंडक्टरला कानशि‍लात लगावली त्यानंतर संतापलेल्या कंडक्टरने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण सुरु केली. ही घटना व्हिडीओमध्ये कैद झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. घनश्याम शर्मा असे या कंडक्टरचे नाव आहे.

हेही वाचा – खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

नेटकऱ्यांनी कशी प्रतिक्रिया दिली

श्री मीना यांच्या तक्रारीवरून शनिवारी कानोटा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आणि सध्या सविस्तर चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने आरोपी कंडक्टरला गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video ex ias officer assaulted by bus conducter for not paying 10 extra for missing stop fir lodged snk