Viral Video : लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असलेला एका व्यक्तीचा नाचतानाचा व्हिडीओ आढळून आला. एनसीआरमध्ये (दिल्ली) एका चोराला लोकांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला मारहाण करीत सर्वांसमोर भोजपूरी गाण्यावर जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, असा दावा व्हिडीओसह करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडीओची आता चर्चा सुरू आहे. पण खरंच एनसीआरमध्ये चोराला अशा प्रकारे जमावाने मारहाण करीत नाचायला लावले का? जाणून घेऊ व्हिडीओमागची सत्य बाजू…

काय होत आहे व्हायरल?

X युजर Ghar Ka Kalesh ने एक्सवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्तेदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

इन्स्टाग्रामवर अनेक मीम पेजही व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड केला. त्यानंतर व्हिडीओमधून कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला YouTube वर व्हिडीओचा स्पष्ट स्वरूपातील मोठा भाग सापडला.
https://www.youtube.com/watch?v=Y0QNiy2ez0k

हेही वाचा- उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वाकून केला नमस्कार? फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण; पण ‘या’ लहानशा गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं

त्यानंतर आम्ही हा व्हिडीओ स्क्रीनग्रॅब्स मिळविण्यासाठी वापरला आणि नंतर त्यावर रिव्हर्स इमेजद्वारे शोध घेतला. त्यावेळी आम्हाला ११ दिवसांपूर्वी YouTube वर पोस्ट केलेला एक दुसरा व्हिडीओ सापडला.

हॅशटॅगमध्ये नमूद केलेल्या वर्णनावरून हा व्हिडीओ बांगलादेशचा असू शकतो.

आम्हाला TikTok वर पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला.

@md.sohag823

#ভাইরাল_ভিডিও_টিকটক।

♬ original sound – md sohag

TikTok 1.jpg

आम्हाला काही पोस्टदेखील आढळल्या; ज्यामुळे हा व्हिडीओ बांगलादेशचा असल्याचे लक्षात आले.

बांगलादेशमध्ये एका दरोडेखोराला पकडल्यानंतर डान्स करायला लावल्याचा व्हिडीओही शेअर करण्यात आला होता. ११ ऑगस्ट रोजी अपलोड केल्या गेलेल्या एका विशिष्ट व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले होते.

Blood Donation Bangladesh Welfare Foundation ने देखील हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : नाच वेड्या, कोणीही असो; जर तुम्ही चोर, दरोडेखोर म्हणून पकडले गेलात, तर तुम्हाला स्वतःला खूप नाचावे लागेल आणि तुम्हाला नाचवावे लागेल.

त्यानंतर आम्ही बांगलादेशातील तौसिफ अकबर या वरिष्ठ तथ्य तपासकांशी संपर्क साधला. फेसबुकवर पहिल्यांदा दिसलेली एक पोस्ट त्यांनी आमच्याबरोबर शेअर केली.

बांगलादेशातील राजशाही येथील मोहम्मद इद्रिश अली यांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे विविध व्हिडीओ शेअर केले होते. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : भावा, हे काय आहे?

रॅगिंगची एक पातळी असते; पण तुम्ही ती पातळीही ओलांडली आहे आणि ती कायम लक्षात राहील.

या पोस्टमध्ये चोराला पकडले गेल्याचे आणि नंतर लोकांनी त्याला डान्स करायला लावल्याचे अनेक व्हिडीओ होते.

तौसिफनेही हा व्हिडीओ बांगलादेशचा असल्याची पुष्टी केली आहे.

निष्कर्ष : बांगलादेशातील व्हिडीओमध्ये एका पकडलेल्या चोराला नाचण्यास भाग पाडले, तो व्हिडीओ आता भारतातील एनसीआरमधील असल्याचा दावा करीत व्हायरल केला जात आहे. त्यामुळे हा दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader