कुटुंब हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे ज्याशिवाय आपण जगण्याचा विचारही करू शकत नाही कुटुंब सुखी असणं, हे आजच्या धावपळीच्या जगात किती कठीण आहे हे आपण सगळेजण जाणतो. वेळ मिळत नसल्यामुळ आपण आपल्या कुटुंबासोबत एकत्र कधीतरीच असतो. शिवाय, भांडणही होत असतात. कुटुंबात चांगलं वातावरण असावं, अशी आपली सर्वांची इच्छा असते. मात्र आपल्याला काय हवंय आणि आहे यामधील अंतर भरणं फार कठीण आहे. दरम्यान जर दिवसभर पाहिलं तर, सगळेच आपआपल्या कामात बिझी असतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणाला तरी सगळे एकत्र बसावे असे आपल्या आईला, बायकोला वाटतो. मात्र तरीही काहीजण जेवतानाही मोबाईल पाहतात.
प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं अनेकांना अजिबात चर्चा होत नाही. यामध्ये फक्त मुलांना दोष देऊन उपयोग नाही, तर त्यामध्ये अनेक आई-वडिलांचा सुध्दा दोष आहे. जेवण करीत असताना आई-वडिलांच्या हातात सुध्दा मोबाईल असतो. याचमुळे एका स्त्रीने भन्नाट उपाय शोधलाय. व्हिडीओ ट्विटरवरती ज्यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये एका आईची निन्जा टेक्निक असं म्हटलं आहे.
जेवत असताना अनेकजण मोबाईल पाहण्यात व्यस्त असतात. त्यामुळे अनेकांना जेवण करीत असताना त्यांना डिस्टर्ब होतं. व्हिडीओ ट्विटरवरती ज्यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये एका आईची निन्जा टेक्निक असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फॅमिली मेंबर्स आपआपले मोबाईल डायनिंग टेबलवर जमा करीत आहे. या महिलेने घरच्यांना अशी अट घातली आहे की, मोबाईल ठेवा, जेवायला बसा. त्यामुळे ती मोबाईल जमा केल्यानंतरच एका एकाला मोबाईल देताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला तरुणीने दिला चोप, चपलेने केली धुलाई
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही या महिलेचे कौतुक केलंय.