Viral Video: मित्र-मैत्रिणी किंवा कटुंबाबरोबर सहलीला जाताना आपण चिप्स, बिस्कीट किंवा घरातून पदार्थ बनवून खायला घेऊन जातो. तर, काही जण बाहेर हॉटेल, स्टॉलवर जेवतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे चक्क एका कुटुंबाने सहलीला जाण्यासाठी स्वतःच्या गाडीमध्येच दुसरं स्वयंपाकघर तयार केलं आहे ; जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, .
चिक्की आणि कपिल या जोडप्याने त्यांच्या कारचा नक्षा बदलून त्याचे स्वयंपाक घरात रूपांतर केलं आहे. ‘होम ऑन व्हील्स’ ही कॉन्सेप्ट सादर करत या जोडप्याने त्यांच्या कारमध्ये अशा प्रकारे बदल केले आहेत की, त्यांच्या कारच्या डिक्कीत एक पूर्ण स्वयंपाकघर तयार केलं आहे . ड्रॉवर, फळ्या (शेल्फ ) व कप्प्यांसह प्रवासात स्वादिष्ट अन्न शिजवण्यासाठी डबल-बर्नर गॅस स्टोव्ह सुद्धा आहे. एकदा पाहाच चालत्या फिरत्या गाडीतील हे अनोखं स्वयंपाक घर.
हेही वाचा…काय सांगता? तरुणाने कपाळावर काढला थेट QR कोडचा टॅटू; स्कॅन करताच दिसणार… पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चार जणांचे हे कुटुंब कॅम्पिंग ट्रिपसाठी कोणतेही हॉटेल बुक न करता सहलीचा आनंद घेत आहेत. कारण – स्वयंपाक घराबरोबर त्यांनी प्रवासा दरम्यान झोपण्यासाठी त्यांनी गाडीच्या सीटवर गादी सुद्धा हतरली आहे. मसाले, गॅस, किराणा मालाचे सामान, स्वयंपाक करताना लागणारी भांडी, पीठ, भात, डाळ , रोज स्वयंपाक घरात लागणारे पदार्थ आदी अनेक गोष्टी ठेवण्यासाठी या गाडीत व्यवस्थित कप्पे तयार करून घेतले आहेत.
सोशल मिडियावर हा व्हिडीओ @ghumakkad_bugz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नेटकरी कारच्या या खास रचनेबद्दल विविध प्रश्न या जोडप्याला विचारताना दिसत आहेत. अनेक जण ‘हे सर्व करून घेण्यास किती खर्च झाला’, ‘गॅस सिलेंडर नक्की कुठे बसवला ‘ असे अनेक प्रश्न विचारताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.