7 People Ride On One Bike: इंटरनेटच्या जगात कॉमेडी व्हिडिओंची एक मालिकाच आहे. युजर्स त्यावर भरभरुन प्रेम करतात. असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण कधीकधी लोक प्रसिद्ध होण्यासाठी अशा काही गोष्टी करतात, लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका बाईकवर एक-दोन नव्हे तर तब्बल सात जण बसलेले दिसून येत आहेत. हे सात जण बाईकवर कसे काय बसले असतील, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या बाईकवर संपूर्ण कुटुंबालाच घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. भारतीय लोकांचे जुगाड या गोष्टीत विशेष प्राविण्य आहे. भारतीयांनी बनवलेल्या जुगाडाचे फोटो-व्हिडीओ नेहमीच पाहायला मिळतात. आपली गरज कमीत कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी लोक जुगाड करत असतात आणि हे जुगाड व्हायरल होऊन लोकांना नवनवीन आयडिया देत असते. असाच एक जुगाड करत या व्यक्तीने एका बाईकवर तब्बल सात जणांच्या कुटुंबाला बसवलं आहे.

आणखी वाचा : नदीखाली सापडले ३,४०० वर्षे जुने शहर, VIRAL PHOTOS पाहून थक्क व्हाल!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरूवातीला एक पुरूष बाईकवर बसून आपल्यापुढे मुलीला बसवलेलं आहे. त्यानंतर एक महिला खाली उभे असलेल्या बच्चे कंपनीपैकी आणखी एका मुलीला आधीच्या मुलीपुढे बसवते. त्यानंतर हा व्यक्ती आपली बाईक सुरू करतो आणि त्यानंतर त्याच्या मागे दुसरी महिला एका मुलीला मांडीवर घेऊन मागच्या सीटवर बसते. आता हे दृश्य पाहून तुम्हाला असं वाटेल, बस्स…आता यापेक्षा जास्त आणखी या बाईकवर कुणी बसूच शकत नाही. पण थोडं थांबा. हा व्हिडीओ इथेच संपत नाही. मागच्या सीटवर बसलेली महिला थोडं पुढे सरकून आपल्यामागे आणखी जागा करते. नंतर बाजुला उभी असलेली महिला आणखी एका लहान मुलीला उचलून सर्वात मागे बसते. आहे की नाही जुगाड?

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये बाईकवर बसलेल्या सातही जणांपैकी कुणीच डोक्यावर हेल्मेट घालतेलं दिसून येत नाहीय. या व्हायरल व्हिडीओने साऱ्यांनाच हैराण करून सोडलंय. ‘नि:शब्द’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

आणखी वाचा : हत्तीने बाप्पाच्या गळ्यात हार घालून केले स्वागत, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आवर्जून तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून लोक आपला जीव कसा धोक्यात घालत आहेत हे अधोरेखित केले तर काहींनी योग्य वाहतूक सुविधा नसल्यामुळे त्यांनी याचा अवलंब केला असेल, असा युक्तिवाद केला.

Story img Loader