रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी तेलंगणातील हैदराबादमधील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून सुमारे १८ लाख रुपये किमतीचे आणि ३५० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. सोनं लपवण्यासाठी जी शक्कल या महिला प्रवाशाने लढवली होती ती बघून सगळेच चक्रावून गेले. नक्की काय झालं जाऊन घ्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला दुबईहून हैदराबादला आली

तेलंगणातील हैदराबाद येथील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुरख्यात सोनं लपविल्याचे समोर येताच उपस्थित लोक चक्रावून गेले. तेथे महिलेला बुरखा काढण्यात सांगितलं आणि बुरख्यातून लहान सोन्याच्या गोळ्या काढण्यात आल्या. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. या प्रवाशाने बुरख्यावर शिलाई केलेले रोडियम लेपित मण्यांच्या स्वरूपात सोने लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याचे वजन ३५० ग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हे ही वाचा: शिवसेना कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल! दोन मिनिटं सोडवत होते मास्कचे गणित)

बुरख्यावर चिकटलं होत सोनं

दुबईहून आलेल्या महिलेने बुरख्यात १८ लाखांचे सोने चिकटवले होते, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. बुरख्यात मोती जडल्यासारखा दिसत होते. पण ती मशीनला फसवू शकली नाही मशीनमुळे ते मोती नसून सोनं असल्याचे लक्षात आलं आणि ती पकडली गेली.

(हे ही वाचा: पावनखिंड चित्रपटाच्या वेळी सांगलीच्या चित्रपटगृहात तरुणांनी दिली शिवगर्जना; अंगावर काटा आणणारा Video Viral)

त्याचवेळी, या जप्तीनंतर पोलिसांनी महिलेला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अटक केली आहे. या महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुरखा घातलेल्या महिलेने हे सोने रोडियमने गुंडाळलेल्या मण्यांच्या स्वरूपात लपवले होते, जे बुरख्याला शिवले होते. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोनं मणी प्रकाराचे होते. त्याचा शोध घेतला त्यावेळचा व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video fashionable attempts at gold smuggling she came to india wearing gold beads on her burqa but ttg