Viral Video: एक जंगल सफारी तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाते. पण अलीकडे निसर्गाच्या सानिध्यात जाण्याच्या नावाखाली माणसाने मुक्या प्राण्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण केली आहे. अनेकदा पर्यटकांना घुसखोर समजून जेव्हा वन्य जीव हल्ला करताना पाहायला मिळतात तेव्हा याची पुरेपूर प्रचिती येते. असाच काहीसा अव्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एक संतप्त हत्ती पर्यटकांच्या सफारी जीपकडे धावताना दिसत आहे.

तसं पाहायला गेलं तर हत्ती हा एक अगदी शांत स्वभावाचा प्राणी म्हणून ओळखला जातो, जोपर्यंत कोणी त्याची मुद्दाम छेद काढत नाही तोपर्यंत तो विनाकारण उपद्रव करत नाही पण या व्हिडिओमधील गजराज इतके चिडले आहेत की त्यांनी भेटीला आलेल्या पर्यटकांना पळवून लावण्याचा जणू काही निश्चयच केला होता. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता, पर्यटकांनी भरलेल्या सफारी जीपच्या समोरून एक हत्ती धावत येत आहे, जोरजोरात चित्कारुन हत्ती या पर्यटकांना हे माझं घर आहे तुम्ही इथून निघून जा असे सांगण्याचा जणू काही प्रयत्नच करत आहे.

Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या गुप्तांगावर कुत्र्याचा हल्ला; CCTV मध्ये कैद झाला अंगावर काटा आणणारा क्षण

पहा हत्तीचा हल्ला

सुदैवाने व्हिडीओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे, हत्ती धावत येताना पाहून जीपचा ड्रायव्हर तात्काळ कार उलट्या बाजूला फिरवताना पाहायला मिळतो. अखेरीस जेव्हा हत्ती मध्येच थांबून जंगलात निघून जातो, तेव्हा पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसेच या व्हिडिओनंतर ड्रायव्हरच्या समयसूचकतेचं सुद्धा नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

३२-सेकंदाच्या व्हिडिओला ट्विटरवर १, ४०६ रिट्विट्स आणि १६० कमेंट्स व २,६५,००० व्ह्यूज आहेत. इतर वापरकर्त्यांनी प्राण्यांच्या प्रदेशात अतिक्रमण केल्याने आता त्याचा बदला घेण्यासाठी हे प्राणी असे वर्तन करतात अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

Story img Loader