Viral Video: समाजमाध्यमांवर आपण अनेक व्हिडीओ पाहतो. ज्यातील काही व्हिडीओ कोणीतरी नकळत शूट केलेले असतात, जे खूप व्हायरलही होतात आणि त्यावर लाखो व्ह्यूज मिळतात. यातील बरेच व्हिडीओ सार्वजनिक ठिकाणांवरील असतात तर काही व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे असतात. ज्यात कधी अपघात, भांडणं किंवा एखादी मजेशीर गोष्ट पाहायला मिळते. सध्या असाच एक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती त्याच्या मुलाबरोबर असं काहीतरी करतोय की, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही वडील आणि मुलाच्या नात्यामध्ये नेहमीच गमतीशीर किस्से पाहायला मिळतात. आईप्रमाणेच वडीलदेखील आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. सोशल मीडियावर वडील आणि मुलाच्या नात्याचे व्हिडीओदेखील खूप व्हायरल होत असतात. ज्यात कधी ते रील्स बनवताना तर कधी डान्स, गाणी म्हणताना तसेच खेळतानादेखील दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, पण यामध्ये असं काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरून एक वडील आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात आहेत. यावेळी रस्त्यावर पाऊसही पडत आहे, पण यावेळी वडिलांनी मुलाची छोटी छत्री स्वतःच्या डोक्यावर घेतली असून मुलगा बिचारा पावसात भिजत असल्याचे दिसत आहे. शिवाय यावेळी मुलाच्या खांद्यावर त्याची बॅगदेखील होती. एका शॉपमध्ये बसलेल्या व्यक्तीला हा प्रकार दिसल्यावर त्याने लगेच हा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक युजर्स यावर एकापेक्षा एक कमेंट्स करत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील@cutestatus.comया अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘याला म्हणतात मर्यादेत राहून नाचणं…’, कपल्सने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “काय बाप बनशील रे तू”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “बहुतेक मुलालाच भिजायचं असेल”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “याला फादर ऑफ द इयर द्यायला हवा”; तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “ग्रेट डॅड.”

दरम्यान, यापूर्वीदेखील वडिलांचे आणि मुलाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओमध्ये पत्नीने मुलावर लक्ष ठेवायला सांगितल्यावर एक वडील मुलाच्या पायाला दोरी बांधून झोपी गेले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.