Viral Video: प्रत्येक व्यक्तीसाठी आई पहिला गुरु असते. आई आपल्या मुलांना जीवापाड जपते. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून ती मुलांचा जीव वाचवते. मुलांना योग्य संस्कार लावणं, त्यांना चांगल्या-वाईट गोष्टी समजावून सांगणं, मुलांचे लाड करणं किंवा त्यांच्यावर रागावणं हे सर्व आईच करू शकते. आईचा ओरडा खाणं आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. आपल्या वाईट गोष्टींवर नेहमीच आईचे लक्ष असते, ज्यावरून ती आपल्याला सतत ओरडत असते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे; जो तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण देईल.
अशी एकही व्यक्ती नसेल जिने त्याच्या आईचा ओरडा किंवा मार खाल्ला नसेल. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात किमान एकदा किंवा अनेकदा आईचा ओरडा आणि मार खातोच. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात दोन भावंडं आईच्या मारापासून वाचण्यासाठी घरात असं काही करताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये वडील टीव्ही बघत असून अचानक भाऊ-बहीण धावत त्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर आईला जवळ येताना पाहून मुलं आणि वडील तिघेही हॉलमधून बाहेर पळत जातात. आई हातामध्ये चप्पल घेऊन येते आणि त्यांना पळत गेलेलं पाहून त्यांच्या दिशेने चप्पल फेकते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे अनेकांना त्यांचे बालपण आठवत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ ट्विटरवरील @geetappoo या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “वडिलांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून मुलांना वाचवलं’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर एका युजरने लिहिलं की, “शेवटी बाप बापच असतो.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बाप मुलांवरील संकटं स्वतःवर घेतो.”