Viral Video Father-Son Working hard: बाप-लेकीचं नात खूप खास असते, असे म्हणतात आणि त्यामुळेच बाप मुलापेक्षा जास्त त्याच्या मुलीच्या जवळ असतो. पण, मुलाच्या पाठीशी अप्रत्यक्षपणे उभा राहणारा बाप खूप कमी जणांना कळतो. बाप त्याच्या लेकाला जगाची आणि सत्य परिस्थितीची ओळख करून देत असतो.

मुलगा मोठा झाला की, बापाच्या खांद्याला खांदा लावून त्याने घराची जबाबदारी सांभाळावी अशी बापाची इच्छा असते. आपण जे काही कष्ट सोसले आहेत ते मुलाच्या वाट्याला येऊ नये यासाठी सकाळी पैसे कमावण्यासाठी घरातून बाहेर पडलेला बाप संध्याकाळी थकून भागून घरी येतो. पण याची जाणीव लेकरांना हवी हेही तितकेच खरे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा… Viral Video: “भाई अभी रुलाएगा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहते झाले भावुक, म्हणाले…

आपल्या लेकाचे भविष्य उज्ज्वल व्हावे हे प्रत्येक आई-बापाला वाटत असते. म्हणून त्यांची दिवसरात्र धडपड सुरूच असते. आई-वडिलांची ही धडपड काही मुलांना नकळत्या वयातच कळते. आपल्या पालकांना आधार देण्यासाठी लहान वयातच ती मुले समजूतदार होतात आणि पडेल त्या कामात आई-बापाला मदत करतात. याचीच जाणीव करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बाप-लेकाचा व्हायरल व्हिडीओ

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी भरउन्हात बाप ताशा वाजवताना दिसतोय; तर बापाला आधार व्हावा म्हणून त्याचा लेक शेकर वाजवताना दिसतोय. उतारवयात बापाची साथ देणारा आणि आपल्या परिस्थितीची जाणीव असल्याने बापाबरोबर खंबीरपणे उभा राहणारा हा लेक म्हणजेच एक भावनिक आणि आर्थिक आधार. स्वत:चे दु:ख सांभाळून दुसऱ्यांना आनंद देताना बाप-लेक एकमेकांची साथ मात्र सोडत नाही.

“बाप सांगतो, लेका..! हिमतीनं लढत राहायचं, हार-जीत होणार; पण हटायचं नाही…!” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. ‘mpsc_short_notes’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

“रागवतो माझ्यावर बाप माझा उद्याच्या माझ्या भविष्यासाठी. त्याला माहीत आहे. त्याच्यानंतर कोणी येणार नाही, माझी संकटं झेलण्यासाठी” असे या व्हिडीओमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “आयुष्यात सगळी नाती नकली असतात. वेळ आली की, सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी आयुष्यभर सोबत राहतात. एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ!” तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “परिस्थित पुढे हतबल झालेला बाप आणि त्या परिस्थितीला साथ देणारा त्याचा मुलगा…. निशब्द!” “खरंच डोळे आणि मन भरून आलं” असंही एक जण म्हणाला. अनेक जण हा व्हिडीओ पाहून भावूक झाले.

Story img Loader