बाप आणि मुलगा यांचं हळुवार नातं फुलत असतं. मात्र तितकाच बळकट प्रेमाचा बंध त्या दोघांमध्ये जोडला जातो. आपल्या मुलाने शिकावे, मोठे व्हावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे यासाठी प्रत्येक बाप धडपडत असतो. मुलाला आपल्या बापाबद्दल भीती आणि आदर वाटत असतोच. पण त्यामुळे त्यांच्यातलं प्रेम कधीच आटत नसतं. असाच एक बाप-लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये लेकापासून दोन हजार मैल दूर असलेल्या बापाने जे सरप्राईज दिलंय, ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरूवातीला हा मुलगा त्याच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी नाव जाहीर होताच स्टेजवर येताना दिसत आहे. त्यानंतर काही विद्यार्थी सुद्धा त्यांचे नाव जाहीर होताच स्टेजवर येऊ लागतात. त्याचवेळी या मुलाचे वडील या सोहळ्यात सहभागी होतात. आपल्या दीक्षांत सोहळ्यात वडील आलेले पाहताच हा मुलगा भावूक होतो. त्याचे डोळे पाणावतात. पण स्टेजवर बसल्याकारणाने हा मुलगा आपल्या भावनांवर कसंबसं आवर घालतो. त्यानंतर शाळेतल्या पदाधिकाऱ्यांकडून त्याला पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी बोलावलं जातं. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताच वडील या मुलाकडे येतात आणि त्याच्या गळ्यात हार घालून त्याचं अभिनंदन करतात. त्यानंतर हा मुलगा पुढे जाऊन आपले पदवी प्रमाणपत्र घेतो आणि त्याच्या नजरा वडिलांना शोधू लागतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : निर्दयी आई! गृहपाठ केला नाही म्हणून हात पाय बांधून तळपत्या छतावर झोपवलं

पदवी प्रमाणपत्र घेतल्यानंतर हा मुलगा आपल्या वडिलांना भेटतो आणि एक घट्ट मिठी मारतो. बराच वेळी तो आपल्या वडिलांची घट्ट मिठी सोडतच नाही. नंतर शेवटी त्याला त्याच्या भावना अनावर होतात आणि पायऱ्यांवर बसून ढसाढसा रडू लागतो. त्यानंतर त्याचे वडील त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला सावरू लागतात. पुन्हा बाहेर त्याची वडिलांची भेट झाल्यानंतर त्यावेळीही त्याला रडू आवरत नाही. धावत जाऊन पुन्हा तो वडिलांना घट्ट मिठी मारतो आणि जोरजोरात रडू लागतो.

आणखी वाचा : सायकल चालवता चालवता गोरिला धापकन खाली पडला, रागात त्याने काय केलं? पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मून वॉक करताना अंतराळवीर धाडकन कोसळला, या मजेदार क्षणाचा VIDEO VIRAL

आपल्या मुलाला पदवीधर होताना पाहण्यासाठी या बापाने जवळपास २ हजार मैल इतक्या दूर अंतराचा प्रवास केला. हा व्हिडीओ मुलाच्या आईने calibornbree नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की तीन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून सारेच जण भावूक होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या बाप-लेकाच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केलाय.