Viral Video: कॉफी म्हटलं की दुधाळ क्रीम टाकलेली किंवा फेसाळलेला कॉफीचा एखादा वाफाळता कॉफीचा कप आपल्या डोळ्यासमोर येतो. ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, कॅफे लाते, कॅपिचिनो, स्ट्राँग कॉफी आदी अनेक प्रकार कॉफीचे कॉफीप्रेमी पितात. कोणत्याही कॅफेमध्ये तुम्ही गेलात की, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे कॉफी सव्र्ह केल्या जातात. तुम्ही फक्त कॉफीची ऑर्डर दिली तर तुमच्यासमोर फेसाळलेला कॉफीचा कप दिला जातो. पण, तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बनवलेली कॉफी प्यायली आहे का ? नाही…. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यात एका विक्रेत्याने चक्क प्रेशर कुकरच्या मदतीने कॉफी बनवली आहे.
इंडिया फूड हसल या इन्स्टाग्राम युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. एका कॉफी विक्रेत्याने त्याचे आश्चर्यकारक कॉफी बनविण्याचे तंत्र दाखवून सगळ्यांना थक्क केलं आहे. तो स्टीलच्या कपात दूध, कॉफी, साखर घालतो आणि मग पुढे मशीनला जोडलेले प्रेशर कुकर दाखवतो. ज्यामध्ये स्टीलचा एक अनोखा पाईप प्रेशर कुकरच्या शिट्टीजवळ जोडलेला असतो. ज्यामधून वाफ निघत असते. तो कॉफीचा कप त्या अनोख्या सेटअप जवळ घेऊन जातो आणि त्यात पाईप बुडवतो. विक्रेता नक्की पुढे काय करतो व्हायरल व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…पाहुणे येती घरा… गोडधोड जेवण ते चहाचा घोट; VIDEO तील पाहुणचार पाहून हसून-हसून व्हाल लोटपोट
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, विक्रेत्याने प्रेशर कुकरच्या शिट्टीजवळ जोडलेल्या पाईपच्या मदतीने फेसाळलेली कॉफी तयार केली आहे. त्यानंतर कॉफी कपमध्ये ओतून ग्राहकाला देतो. कॉफीचे सेवन केल्यानंतर ग्राहकाला सुद्धा या कॉफीची चव खूप आवडते व तो विक्रेत्याची प्रशंसा करताना व्हिडीओत दिसत आहे. कॉफी बनवण्यासाठी हे अनोखे तंत्र कुठून शोधून काढले असे विक्रेत्याला विचारले असता. विक्रेता मार्केटमधून खरेदी केले असे सांगताना दिसत आहे. एकूणच विक्रेत्याच्या या कल्पकतेचं सर्वत्र कौतुक होताना दिसून आले आहे.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @india_food_hustle या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना फूड ब्लॉगरने कॅप्शन दिले आहे की, “अतरंगी प्रेशर कुकरवाली कॉफी, ब्रँड कॉफीपेक्षाही भारी’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.कॉफी बनविण्याच्या प्रक्रिये दरम्यान दोघही हिंदी भाषेत संवाद साधताना दिसून आले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकरी हे टॅलेंट भारताबाहेर जाता कामा नये ; असे आवर्जून सांगताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.