Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक जंगली कुत्रा हरणाची शिकार करताना दिसत आहे.

समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक जंगली कुत्रा हरणाची शिकार करताना दिसतोय.

The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल
Dogs Killed
Dogs Killed : अमानवी कृत्य… कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकून दिलं; २१ श्वानांचा मृत्यू, २१ गंभीर
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम
Animal lovers demand stricter animal laws
प्राणीविषयक कायदे कडक करण्याची गरज, प्राणीप्रेमींची मागणी

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलातील एका झाडाखाली एक जंगली कुत्रा हरणावर हल्ला करताना दिसतोय. जंगली कुत्रा हरणाची सरळ मान आपल्या जबड्यात पकडून त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतो. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @latestkruger या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये, “जंगली कुत्र्याला हरण सापडले!” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील प्राण्यांचे असे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात हिंस्र प्राणी शिकार करण्यासाठी त्यांच्या युक्तीचा कसा वापर करतात, हेदेखील पाहायला मिळालं होतं.

Story img Loader