Shocking video: सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितले जातात. तुम्ही इंटरनेटवर सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. जंगलाचा राजा सिंह येताना दिसला की घाबरुन सगळेच प्राणी धूम ठोकतात. पण सध्या सोशल मीडियावर एक सिंह आणि सिंहिणीच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिंहिणीची डरकाळी ऐकून जंगलाचा राजा काही पावलं मागे हटताना दिसतो.
जंगलाचा राजा सिंहाला सर्वच घाबरतात. मात्र जेव्हा शिकारीची वेळ येते तेव्हा सिहिंणच भारी पडते. शिकार करुन सिहिंण सिंहाला खायला जेवणाची व्यवस्था करत असते. त्यामुळे सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी सिहिंणच जास्त वेळा शिकार करताना आढळते. अशातच जेव्हा सिंह आणि सिंहिण एकमेकांनी भिडतील तेव्हा काय होईल? या विचारानंही अंगावर काटा येईल. मात्र एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामझ्ये सिंहिण आणि सिंह चक्क एकमेकांशी लढाई करताना दिसतायेत.
सिंह आणि सिंहिणची एकमेकांशी लढाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओ पाहिल्यावर दोघेही एकमेकांना टफ फाईट देत असल्याचं दिसतंय. या लढाईत शेवटी कोण जिकंल हे पाहुया. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सिंहीण आरामात झोपलेली दिसत आहे. याचवेळी, सिंह दबक्या पावलांनी मागून हळू हळू त्याच्याकडे जातो. सिंहाच्या आगमनाची जाणीव होताच ती ताबडतोब उठते आणि त्याच्यावर हल्ला करते. सुरुवातीला सिंह सामना करण्याच्या मूडमध्ये असतो परंतु लवकरच तो आपली हार मानतो आणि शांत होतो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर @Naturelsmetall नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून जास्त जणांनी बघितला असून त्यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी सिंह आणि सिंहिणीच्या या भांडणाची तुलना नवऱ्या बायकोच्या भांडणाशी करत असून मजेशीर कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ‘राजघराण्यात असो किंवा सामान्य आयुष्यात, नवरा बायकोची भांडणं सगळीकडे सारखीच असतात’, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.तर एकानं म्हंटलंय, “भावा सिंह अशील तू पण बायको बायको असते”