दिल्ली मेट्रो ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. लाखो प्रवासी दररोज मेट्रोचा वापर करतात, त्यामुळे गर्दीतून किरकोळ वाद होणे फारसे अनपेक्षित नाही. मात्र, अलीकडेच घडलेली एक घटना साध्या वादाच्या पलीकडे गेली आहे. दिल्ली मेट्रोमधील दोन प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोन पुरुष एका किरकोळ वादातून मारामारी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते एकमेकांना बुक्या मारताना दिसतात, ज्यामुळे अचानकपणे एकजण खाली पडतो. मात्र, खाली पडल्यानंतरही भांडण थांबत नाही. जवळ बसलेल्या महिलांच्या आरडाओरडा ऐकूनही हा वाद थांबत नाही. काही प्रवासी भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण दोघेही ऐकायला तयार नसतात. १२ सेकंदांचा हा व्हिडिओ @gharkekalesh या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. भांडण कशामुळे झाले आणि त्याचा शेवट कसा झाला, याची माहिती अजून मिळालेली नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा –“आता हेच पाहणे बाकी होते”, चक्क बटरमध्ये भाजला आईस्क्रिम पाव, Viral Video पाहून संतापले नेटकरी

या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने कमेंट केली, “वेलकम टू दिल्ली मेट्रो. नेक्स्ट स्टेशन: फिस्टफाइट.” दुसऱ्याने लिहिले, “दिल्ली मेट्रोत करमणुकीची कधीच कमी नाही.” तर तिसऱ्याने पुण्यासाठी मेट्रोची मागणी करत लिहिले, “पुण्यात मेट्रो सुरू करा, कारण आम्हालाही भांडण बघायचं आहे!”

मात्र, काही युजर्सनी अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. काहींनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या वादविवादांची संख्या वाढत असून, नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणे गरजेचे आहे.

हेही वाचा –Viral Video: भरधाव वेगाने येणारा दुचाकीस्वार थेट जाऊन दुभाजकला धडकला, दुचाकीसह हवेत उडला अन् ट्रक… काळजात धडकी भरवणारा अपघात

दिल्ली मेट्रो व्यवस्थापनाने अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत, असे नेटिझन्सचे मत आहे.