Flight Passenger Removes Clothes Viral Video: जर तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीतच असेल सामानाचं वजन मर्यादेपेक्षा बाहेर गेलं तर किती डोकेदुखी वाढते. देशांतर्गत प्रवासाला साधारण प्रतिव्यक्ती १५ किलो तर आंतरराष्ट्रीय प्रवासात २५ ते ३० किलो वजनाचे सामान आपण आपल्याबरोबर नेऊ शकता. अर्थात प्रत्येक एअरलाईननुसार हा नियम बदलूही शकतो. पण थोडक्यात काय तुमच्याकडे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर मात्र त्याच्या चेक इन साठी वेगळे पैसे भरा, रांगा लावा हा खटाटोप करावा लागतो. यासगळ्यावर तोडगा म्हणून एका प्रवाशाने वेगळाच जुगाड केल्याचा व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. विमानात प्रवाशांसमोर ही व्यक्ती एक एक करून जेव्हा आपली कपडे काढू लागते तेव्हा आधी अनेकांना आश्चर्यच वाटतं पण नंतर त्यामागचं कारण समजताच सगळेच त्याच्या हुशारीची दाद देत आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक व्यक्ती साधी कॅरी बॅग घेऊन विमानात शिरतो. त्याने अंगावर साधारण अर्धा डझनभर कपड्यांचे थर लावलेले दिसतायत. स्वतःच्या सीटजवळ पोहोचताच तो हे कपड्यांचे थर एक एक करून काढू लागतो. कपड्यांच्या वजनासाठी अधिक पैसे भरण्याऐवजी त्याने हे कपडे घालून आपलं सामान वाहून आणलं होतं असं म्हणता येईल. दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तो एक एक करून हेच कपडे काढून सीटच्या वरील सामान ठेवण्याच्या जागेत ठेवत असल्याचे दिसतेय.

Rumors of bombs on planes due to a minor boy tweet Mumbai
अल्पवयीन मुलाच्या ‘ट्वीट’मुळे विमानांमध्ये बॉम्बची अफवा; मित्राला गुन्ह्यात अडकविण्यासाठी खोटा संदेश केल्याचे उघड
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
Israel war attack against Hezbollah continues
इस्रायलचा युद्धविरामास नकार,अमेरिकेसह मित्रदेशांचा प्रस्ताव धुडकावला; हेजबोलाविरोधात संघर्ष सुरूच

X वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला पोस्ट केल्यानंतर काही तासांतच लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. अनेकांनी या तरुणाला हुशार म्हटलं आहे तर काहींनी हसून या हुशारीला दाद दिली आहे. काहींनी असंही लिहिलंय की, जेव्हा ही व्यक्ती कपडे उतरवायला सुरुवात करते तेव्हा आधी हा एखादा स्टंट वगैरे असेल असं वाटतं पण नंतर त्याने अशी शक्कल लढवलीये हे लक्षात येताच ही आयडिया भारी वाटते. काहींनी तर गमतीत असंही म्हटलंय की, बिचाऱ्याने एवढं डोकं लावून आयडिया शोधली पण व्हिडीओ व्हायरल करून लोकांनी ओरडून ओरडून ही स्कीम सगळ्यांना सांगितली आहे. आता पुढच्या वेळी एअरलाईनने नवा काही नियम केला नाही म्हणजे मिळवलं.

Video: विमानात तरुणाने काढले कपडे

हे ही वाचा<< Weird Animal Spotted: समुद्री गाय व वाघाचा लागला शोध? Video मध्ये दिसणाऱ्या गर्दीतूनच समोर आलं सत्य, पाहा तपास

दरम्यान, सुरुवातीला अनेकांना हा व्हिडीओ स्टंटबाजी वाटण्याचं कारण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी अशा विचित्र घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये कधी कुण्या तरुणीने पेट्रोल पंपवर स्वतःचे कपडे काढून धिंगाणा केला आहे तर कधी मंदिरात मुद्दाम नग्न होऊन प्रवेश केला आहे. अशा प्रकरणांमध्ये त्या त्या वेळेस संबंधित व्यक्तींवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती पण त्यानंतरही मेट्रोपासून ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडणे काही थांबलेले नाही.