टीव्हीवरील रिपोर्टरकडून रिपोर्टींग करताना काही चूका घडतात आणि त्याचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. कधी लहान मुले मधे आली म्हणून तर कधी एखादा प्राणी येतो आणि रिपोर्टरची फजिती होते. याशिवाय रिपोर्टरकडूनही काहीवेळी चूका झाल्याने हे प्रसंग सोशल मीडियावर अगदी कमी वेळात व्हायरल होतात. मग त्याबाबतच्या चर्चांनाही मोठे उधाण येते. असाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. मेरी बेथ मॅकडेड या लॉस एंजेलिस मधील केटीएलए न्यूज चॅनलच्या रिपोर्टरचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
टीव्हीवर लाईव्ह जाण्यासाठी मेरी तयार होती. तिला सांगायच्या बातमीची तयारीही तिने केली होती. मात्र टीव्हीवर ती दिसणार त्याच्या काही सेकंद आधी तिच्या अंगावर एक उडणारे झुरळ आले. या झुरळाला बघून ती जोरात ओरडली. त्यावेळी तिच्यासोबत असणारा तिचा सहकारी मदतीसाठी पुढे आला. मात्र आपल्या कपड्यावरुन हे झुरळ झटकण्यात अखेर तिला यश आले. आता अशाप्रकारे अचानक अंगावर झुरळ आल्यावर कोणीही घाबरेलच. मात्र मेरीला पुढे लाईव्ह बातमी द्यायची असल्याने ती सावरली आणि आपल्या कामासाठी पुन्हा तयार झाली.
Ahhhhh: Flying cockroach jumps on @mcdade_mb before her live shot on the @KTLA 5 News at 10p! #RoachBomb pic.twitter.com/ZjbC8NDMuv
— Marcus Wilson-Smith (@MarcusSmithKTLA) August 3, 2017
या सगळ्या प्रकारामुळे तिने दिलेल्या लाईव्ह बातमीमध्ये ती घाबरलेली दिसत होती. आता या झुरळापासून तिने आपली सुटका करुन घेतली खरी मात्र चित्रिकरण पूर्ण झाल्यावर ती स्वतःच आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावर खूप हसली. तिचा सहकारी मार्कस विल्सन स्मिथ याने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. आणि त्यानंतर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्याला यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळाले.