सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. हल्ली सोशल मीडियावर एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही डिलिव्हरी बॉयचे वेगवेगळे व्हिडीओ पाहिले असतील. कुणी घोड्यावरून फुड डिलिव्हरी करताना दिसला तर कुणी सायकलवरून…पण हा व्हिडीओ याहूनही आश्चर्यचकित करून सोडणारा आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका डिलिव्हरी बॉयने यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत थेट उडत उडत उंच इमारतीवर पोहोचला आहे. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. हा व्हिडीओ पाहणं फारच रंजक असणार आहे.

फूड इंडस्ट्रीमध्ये आता अनेक कंपन्या वेगवेगळे प्रयोग करू पाहतेय. यात मग फूड डिलिव्हरी करणारे ड्रोन, रेस्टॉरंट्समध्ये फूड सर्व्ह करणारे रोबोट अशा अनेक शोधांमुळे जेवणाची व्यवस्था करणे तसंच ऑर्डर करणे अतिशय सोपे आणि सोयीचे झाले आहे. कल्पना करा की जर ड्रोन ऐवजी एखादा माणूसच उडत उडत तुमच्या दारापर्यंत आला तर? होय. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून एक फूड डिलिव्हरी बॉय उडत उडत उंच इमारतीवर पोहोचलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्य होऊ लागलेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : विमानतळापेक्षा आलिशान दिसणार भारतातील रेल्वे स्थानके, येत्या काही वर्षात असं चित्र दिसेल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Navratri 2022 : न्यूयॉर्कमध्येही चढला गरब्याचा फिव्हर, टाइम्स स्क्वेअरवर महिलांच्या गरब्याचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सौदी अरेबियातील एका उंच इमारतीवरचा आहे. या उंच इमारतीवर फूड डिलिव्हरी करण्यासाठी हा फूड डिलिव्हरी बॉय उडत उडत पोहोचलाय. एक माणूस जेटपॅकवर उंच इमारतीवरून उड्डाण करत आहे आणि डिलिव्हरी करण्यासाठी पार्सल देखील घेऊन जात आहे. तो त्याच्या लोकेशनला पोहोचण्यासाठी एका टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर उडत जाताना दिसतोय. तो एका बाल्कनीत उतरताना दिसतो जिथे एक महिला तिच्या जेवणाचे पार्सल घेण्याची वाट पाहत आहे. हे वाचून तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. त्यासाठी तुम्हीच स्वतः प्रत्यक्ष हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ४५ वर्षांनंतर आपल्या आजीला भेटायला गेला हा माणूस; पुढे जे घडतं ते पाहून भावूक व्हाल!

हा व्हिडीओ DailyLoud नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतक व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader