आपण फिरावयासाठी कुठे बाहेर गेलो असू किंवा अगदी घराजवळ असलेल्या नाक्यावर जाणार असू, तरीही एखादी चहा टपरी दिसल्यानंतर एक कप चहा पिण्याची इच्छा होते; प्यायला जातो. नवीन जागेवर गेल्यानंतर तर त्या ठिकाणचा चहा, तो बनवण्याची वेगळी पद्धत आणि त्याची खास चव चाखण्यासाठी व्यक्ती हमखास गर्दी असणाऱ्या चहाच्या दुकानावर जातो. काळा चहा, पुदिना घालून बनवलेला चहा, मसाला किंवा कडक आल्याचा, गुळाचा आणि गवती चहा असे कितीतरी प्रकार त्या दुकानावर लिहिलेले असतात.

मात्र, अमृतसरमध्ये या सर्वांपेक्षा एक अतिशय आगळावेगळा आणि भन्नाट असा ‘अमूल बटर’ चहा विकला जातो. याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @chatore_broothers नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेला आहे. आता या चहात वरून नुसते बटर सोडले असेल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तसे अजिबात नाही.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar birthday Celebration photos
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा : Video : ‘गव्हाचे चुरमुरे’ तयार होताना कधी पहिले आहेत का? व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा…

व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, सुरुवातीला एका पातेल्यामध्ये दूध घालून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, साखर, चहा पावडर आणि इतर काही सामग्री घालून साधा चहा बनवून घेतला आहे. नंतर एका खलबत्त्यात बदाम, काजू, वेलची असे सर्व सुकेमेवे घालून त्याची पूड बनवली. शेवटी दुसरे पातेले घेऊन त्यामध्ये भरपूर बटर घालून ते वितळवून घेतले. त्यानंतर तयार केलेली सुक्यामेव्याची पूड घालून काही मिनिटं आपण शिरा किंवा हलवा बनवतो त्याप्रमाणे सर्व गोष्टी परतून मग त्या मिश्रणात तयार केलेला चहा घालून तो उकळला आणि कपात गाळून पिण्यासाठी दिला, असे आपण पाहू शकतो.

नुकत्याच चहाच्या अतरंगी रेसिपीमध्ये बिर्याणी चहानेसुद्धा आपला नंबर लावला होता, तर याआधी सोशल मीडियावर फळांचा चहा, रसगुल्ला आणि चहाचे फ्युजन प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, आत्ताच्या या अमूल बटर चहाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना हा पदार्थ बघून प्यायची इच्छा होत आहे असे समजते; तर काहींनी याला चहा नाही तर हलवा म्हणा, असे म्हटले आहे. नेटकऱ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया पाहा.

हेही वाचा : गरमागरम चहाला द्या ‘मसालेदार’ बिर्याणी तडका; “याला चहा नका म्हणू, हा…” म्हणत नेटकऱ्यांनी रेसिपीवर दिल्या प्रतिक्रिया…

“वाह! काय किंमत आहे या चहाची?” असा प्रश्न एकाने केल्यानंतर, त्यावर दुसऱ्या व्यक्तीने “एका कपाचे १२० रुपये आहेत” असे उत्तर दिले. “थोडा रवा घातला तर हलवा तयार झाला असता” असे तिसऱ्याने लिहिले आहे. चौथ्याने, “यावर चीज का नाही घातलं? चीजशिवाय या चहाला मजा नाही”, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर शेवटी पाचव्याने, “सगळे या पदार्थावर इतकी टीका का करत आहेत, हे मला समजत नाही? या चहामध्ये सुकामेवा, गुलाबाच्या पाकळ्या, साखर, चहा आणि सगळे नेहमीचे मसाले घातलेले आहेत. काश्मिरी चहामध्ये वापरले जाणारे हे नेहमीचे पदार्थ आहेत. फक्त बटरची तेवढी भर आहे. बाकी तो दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे”, असे आपले मत मांडले आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत, ८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader