Dance Viral Video: हल्ली सोशल मीडियामुळे नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यातील काही चर्चेत असलेल्या गाण्यांवर अनेक जण रील्स बनवताना दिसतात. या रील्समध्ये अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. त्याशिवाय या चर्चेत असलेल्या गाण्यांवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘तौबा तौबा’, ‘सुसेकी’ ही गाणी तुफान चर्चेत होती. त्यावर अनेकांनी रील्स बनवलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. या गाण्यांव्यतिरिक्त गुलाबी साडी हे मराठी गाणंदेखील खूप चर्चेत आलं. ज्यावर केवळ भारतीयांनीच नव्हे तर परदेशातील लोकही रील्स बनवीत आहेत. बरेच महिने होऊनही हे गाणं अजूनही खूप चर्चेत आहे. आजही या गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, आता या गाण्यावर एका चिमुकलीनं भन्नाट डान्स केला आहे.

अलीकडची लहान मुलं खूप अॅडव्हान्स झाली आहेत. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यामध्ये ते ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करताना, तर कधी चित्रपटातील डायलॉगवर अभिनय करताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक परदेशात राहणारी चिमुकली गुलाबी साडी या गाण्यावर खूप सुंदर डान्स करत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि डान्स स्टेप्स खूपच लक्ष वेधी आहेत. चिमुकलीचा डान्स पाहून अनेक जण तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत अकरा मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत, तर साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: नोरा फतेहीच्या ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर विद्यार्थ्याचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हा नोराचा…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘असं वाटतंय हे गाणं तुझ्यावर लिहिलं आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूपच सुंदर’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूप सुंदर एक्स्प्रेशन्स’, तर आणखी एकानं लिहिलंय की, ‘ह्या गाण्यावरचा आतापर्यंतचा सर्वांत बेस्ट डान्स’

Story img Loader