काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील एक बदाम विक्रेता बदाम विकण्यासाठी गाणं गाताना सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधली त्याची बदाम विकण्याची स्टाईल लोकांना इतकी आवडू लागली की बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आणि आता तो सोशल मीडियावर ट्रेंड बनला आहे. ‘बदाम बदाम कच्चा बदाम’ हे गाणं आता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागलंय. या गाण्याची क्रेझ थेट टांझानियापर्यंत जाऊन पोहोचली आहे. नेहमीच बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडीओ शेअर करत चर्चेत येत असलेला टांझानियन तरूणाने आता या ‘कच्चा बादाम’वर एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ फारच मनोंरंजक आहे.
टांझानियन तरूणाच्या डान्स व्हिडीओंचा गेल्या काही दिवसांपासून भारतात दबदबा कायम आहे. हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचे या तरूणाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या अनेक बॉलिवूड गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स व्हिडीओ शेअर करत हा तरूण नेहमीच चर्चेत येत असतो. ‘किली पॉल’ असं या टांझानियन तरूणाचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे जवळपास १० लाखांच्या आसपास फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक डान्स आणि लिपसिंक व्हिडीओल लोक भरभरून प्रतिसाद देत असतात. हल्ली सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ हे गाणं ट्रेंडमध्ये असताना हा टांझानियन तरूण तरी कसा मागे राहिल? त्याने सुद्धा या ट्रेंडमध्ये उडी घेत आपला एक डान्स व्हिडीओ शेअर केलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टांझानियन तरूण किली पॉल आपल्या दिलखुलास अंदाज ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर डान्स करतोय. नेहमीप्रमाणे तो आपल्या पारंपारिक मासाई वेशभूषेत डान्स करताना दिसतोय. किली पॉलने त्याच्या डान्सने लाखो लोकांना स्वतःच्या प्रेमात पाडलं तर आहेच, पण या व्हिडीओमधली त्याची नवी स्टाईल पाहून लोक आणखी त्याच्या प्रेमात पडले आहेत. या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमधल्या त्याच्या डान्स स्टेप्स इतक्या एनर्जेटीक आहेत की ते पाहून हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह तुम्हाला आवरता घेता येणार नाही.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सापाचे लागोपाठ वार आणि उंदराची अगदी ‘ब्रूस ली’ सारखी फाईट, पाहा कोणी मारली बाजी…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
किली पॉलने त्याच्या kili_paul नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. दोन दिवसांपूर्वी त्याने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला ४.३ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाख ३८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सांगा या व्हिडीओमधली बकरी भिंतीवर हवेत उडून गेली की चढून गेली ? अनेकजण गेले गोंधळून
काय आहे ‘कच्चा बादाम’
‘कच्चा बादाम’ हे गाणं असून ते कोणत्याही प्रसिद्ध गायकाने नव्हे तर रस्त्यावर फिरून बदाम विकणाऱ्या व्यक्तीचं कौशल्य आहे. होय, तुमचा विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. या गाण्याला आवाज देणाऱ्या व्यक्तीचे नाव भुवन बड्डोकर असून तो पश्चिम बंगालचा आहे. भुबन कच्च्या बदामाचे गीत गात ग्राहकांना बदाम विकत घेण्यसाठी सांगत असतो. भुबनची बदाम विकण्याची पद्धत लोकांना खूप आवडली. त्याची स्टाइल सोशल मीडिया यूजर्सची मने जिंकत आहे. बघता त्याच्या आवाजतलं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि तो सोशल मीडियावरचा सेलिब्रिटी बनलाय.