इंटरनेट विचित्र व्हिडिओंनी भरलेलं आहे. गाणी, मूव्हीज् वगैरे प्रकार तर असतातच. पण विनोदी आणि विचित्र व्हिडिओज् ची सुध्दा इथे कमी नाही. असे व्हिडिओज् सटासट व्हायरल होतात. गावगप्पांसारख्या त्या इकडून तिकडे जातात. आता इंटरनेटमुळे या ‘जागतिक गावगप्पा’ होतात.
आता असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय.
आपल्या ताटात येणारं अन्न हे अन्न असतं. मग एखादा मांसाहारी पदार्थ असला तरी तो ‘पदार्थ’च असतो. म्हणजे कालवणातला मासा जिवंत वगैरे होणं असे प्रकार एखादं हाॅटेल फारच वाईट असल्याशिवाय होत नाही. कारण मासा पाण्यातून काढल्यावर जिवंत राहत नाही. मासे पकडले जातात, गोठवले किंवा वाळवले जातात आणि नंतर ते बाजारात आणले जातात. आता एवढं झाल्यावर एखादा मासा जिवंत असेल असं वाटत नाही. पण आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता असंही कधीतरी होऊ शकतं असं वाटायला लागलंयं
हा व्ह्डििओ फेसबुकवर प्रसिध्द झाला आहे. एनटीडी टेलिव्हिजन या फेसबुक पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक संपूर्णपणे गोठलेला मासा एक माणूस फ्रीझरमधून काढून एका पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकताना दिसतो. या भांड्यात आणखीही एक जिवंच मासा आधीपासूनत पोहताना दिसतो. या जिवंत माशासोबत टाकलेला हा गोठलेला मासा सुरूवातीला गोठलेला राहतो खरा. पण काही वेळाने त्याच्यावरचा बर्फ निघून जात आश्चर्यकारकपणे तो पोहायला लागतो. पाहा हा व्हिडिओ
काय आश्चर्य आहे! एखादा संपू्र्णपणे गोठलेला मासा पुन्हा जिवंत झाला.
आता हा मेलेला मासा खरोखरच जिवंत झाला की या व्हिडिओमध्ये काही ट्रिक वापरून तसं भासवलंय, कळायला मार्ग नाही. पण हा व्हिडिओ सगळ्यांना जाम आवडलाय असंच दिसतंय. कारण आतापर्यंत हा व्हिडिओ ९५ लाख वेळा पाहिला गेलाय.
[jwplayer M0KeUcA6]