सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ. सोशल मीडियावर या ना त्या कारणाने रोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. कोणता व्हिडिओ नेटिझन्स डोक्यावर घेतील सांगता येत नाही. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. कधी कधी त्यांची माणसांप्रमाणे वागण्याची कृती पाहून हसू आवरत नाही. काही व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मोठ्या अजगराने एका व्यक्तीला चांगलाच इंगा दाखवला आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसत असलेला अजगर इतका मोठा आहे की, त्याला पाहून अंगाचा थरकाप उडेल. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण एवढा जाड आणि मोठा अजगर खांद्यावर घेऊन फिरण्याचा अट्टाहास करत आहे. अजगराला त्या माणसाचे उचलणे आवडले नाही आणि त्याने हळूहळू त्या व्यक्तीला आवळण्यास सुरुवात केली. अजगराने पकड इतकी घट्ट केली की व्यक्तीला जीव वाचवण्यासाठी आटापीटा करावा लागला. सुदैवाने दोन व्यक्तींनी प्रयत्न कसाबसा त्याला अजगराच्या तावडीतून सोडवलं. अजगराच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर तरुणाने सुटकेचा निश्वास सोडला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट्स करत तरुणाला खडे बोल सुनावले आहेत. काही जणांनी तरुणांच्या सहासीपणाचं कौतुक केलं आहे.