Viral Video: सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे हल्ली अनेक जण रील्स, ब्लॉग बनवताना दिसतात. काही जण तर अगदी उठता-बसता, प्रत्येक गोष्टीची माहिती ब्लॉगद्वारे सोशल मीडियावर शेअर करीत असतात. परंतु सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणं, ब्लॉग बनवणं प्रत्येकालाच आवडत नाही. ब्लॉग, रील्सची आवड असणारी आणि या सगळ्याची आवड नसणारी माणसं जेव्हा एकाच घरात असतात. तेव्हा या गोष्टीवरून सतत ताशेरे उडताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.

घरबसल्या आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी ब्लॉगद्वारे शेअर करून अनेक जण महिन्याला चांगले पैसे कमावतात. त्यामुळे आता अनेक जण व्यवसाय, नोकरी करण्याव्यतिरिक्त फक्त ब्लॉग बनवणंच पसंत करतात. या व्हिडीओतील महिलादेखील पतीजवळ उभी राहून ब्लॉग बनवायला सुरुवात करते. परंतु, यावेळी तिच्याबरोबर असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेचा पती स्वयंपाकघरात कणीक मळत असून, यावेळी ती तिथे जाते आणि ब्लॉग सुरू करून पतीच्या बाजूला उभी राहून त्याला, “मी कशी दिसतेय…”, हा प्रश्न विचारते. यावेळी पतीच्या डोक्यात तीव्र सणक जाते आणि तो सरळ तिच्या तोंडावर जोरात चापट मारतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @meme_with_memer या अकाउउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “असंच पाहिजे हिला”. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मला बरं वाटलं हे पाहून”. आणखी एकानं लिहिलंय, “बिचारी बायको”.