Viral Video: या जगात बाप आणि त्याच्या मुलांचं नातं खूप अनमोल असतं. बाप गरीब असो वा श्रीमंत, तो आपल्या मुलांना नेहमीच त्याच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. असेल त्या परिस्थितीतही तो आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी दिवस-रात्र झटतो. खरंतर अनेकदा आई आणि तिच्या मुलांवरच्या प्रेमाची तुलना इतर कोणत्याच नात्यामध्ये केली जात नाही, असं म्हटलं जातं. पण, आईप्रमाणे बापही आपल्या मुलांवर तितकेच जीवापाड प्रेम करतो. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

समाजमाध्यमांमुळे अनेक विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारे असतात. शिवाय काही नकळत शूट केलेले सुंदर व्हायरल व्हिडीओ पाहून आपण भावूक होतो. अशा विविध व्हिडीओंमध्ये आता आणखी एका सुंदर व्हिडीओची भर पडलेली आहे.

a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Emotional video of a kid selling coconuts from boat hardworking child video viral on social media
जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

मध्यमवर्गीय माणसाची परिस्थिती त्याला खूप काही शिकवून जाते. असेल त्या परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं हे त्याला चांगलं माहीत असतं. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक बाप आपल्या लहान मुलाबरोबर मेट्रोमधून जात असून यावेळी तो आपल्या मुलाबरोबर साध्या बटणांच्या फोनमध्ये फोटो काढताना दिसत आहे. यावेळी त्याला नीट फोटो काढता येत नसल्याने एक व्यक्ती त्याचा फोन हातात घेऊन फोटो काढून देण्यास मदत करतो. या व्यक्तीचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘त्या श्वानाचा इतका तिरस्कार का?’ भररस्त्यात वृद्ध व्यक्तीने लावला श्वानाला गळफास; घटनेचा थरारक VIDEO पाहून संतापले नेटकरी

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_vishwa_96k या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये, ‘जे काही तुमच्याकडे आहे त्यात आनंद शोधा’, अशी सुंदर ओळ लिहिण्यात आली आहे.

Story img Loader