नवरी आणि नवरदेव लग्नात सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतात. लग्नात आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या नजरा त्यांच्याकडेच असतात. नवरदेव आपली वरात घेऊन नवरीच्या दारात येतो. मात्र, नवरीबाई या खास दिवशी तयार होण्यासाठी भरपूर वेळ घेते. दोघंही जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा त्यांची जोडी पाहण्यासारखी असते. यावेळी दोघांनाही एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याची उत्सुकता असते. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नेमका हार घालतानाच नवरा नवरीचा भ्रम निरास झाला आहे. मात्र पुढे नवरदेव जे काही करतो त्यानं सगळ्यांचंच मन जिंकलं. नवरदेवानं जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल असा जोडीदार हवा. या नवरदेवाचं नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरा असावा तर असा!

लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा क्षण, हा क्षण निर्विघ्न पार पडावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये छोटीशी अडचण आली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरी स्टेजवर उभे आहेत, ते एकमेकांना हार घालणार इतक्यात नवरदेवाच्या हातातील हार तुटतो. हे पाहिल्यानंतर नवरीही नाराज होते. मात्र पुढच्याच क्षणी नवरदेव याकडे दुर्लक्ष करत त्या हाराची स्वत:चं गाठ बांधतो आणि अखेर नवरीला हार घालतो. नवरदेवाच्या या कृतीचं सगळ्यांनीच कौतुक केलंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: जेव्हा ‘रक्षक’च ‘भक्षक’ होतात..भर रस्त्यात शाळकरी मुलीची काढत होता छेड; महिलेने रोखलं अन् नंतर…

हा व्हिडीओ weddingsunfolded नावाच्या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज गेले आहेत. तर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत. एका युजरने म्हंटलंय असा जोडीदार प्रत्येक मुलीला मिळावा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video garland broke in hands of groom even before putting it in bride neck srk