गौतमी पाटील हे नाव आजकाल सर्वांनाच माहित आहे. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा आहे, जिच्या नृत्याचे अनेक लोक चाहते आहे. मोठ्यांपासून लहानपंर्यत अनेकांना तिचे नृत्य आवडते. अनेक महिलां देखील तिच्या चाहत्या आहेत. गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नेहमी तिच्या नृत्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षकांचे गर्दी होत आहे. अनेकदा स्टेजवर तिच्या नृत्याने तरुणाईला घायाळ करताना दिसते. कधी महिलांसह तर कधी चिमुकल्यांसह ती नाचताना दिसते. सध्या अशाच एका चिमुकलीसह नृत्य करताना गौतमी पाटीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, गौतमी स्टेजवर नृत्य करत आहे तेवढ्यात एक मुलगी धावत येते आणि गौतमीला मिठी मारते. चिमुकल्या चाहतीचे प्रेम पाहून होणारा आनंद गौतमीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. ती तिच्या चाहतीला मिठी मारते आणि तिच्यासह नृत्य करते. गौतमीच्या शैलीमध्ये ही चिमुकलीदेखील नाचताना व्हिडीओमध्ये दिसते आहे. दोघींनी जबरदस्त नृत्य सादर केले आहे. नेटकऱ्यांना गौतमी आणि तिच्या चिमुकल्या चाहतीचा व्हिडीओ फार आवडला आहे. गौतमी पाटीलला तुम्ही नेहमी नृत्य करताना पाहिले असेल पण गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये ती लहान मुलांसह वेळ घालवताना दिसते. कधी त्यांच्यासह डान्स करताना दिसते, कधी संवाद साधताना दिसते. गौतमी पाटीलचे हे वेगळे रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – ‘एक्स गर्लफ्रेड!’ नावाने उघडले चाटचे दुकान! ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी मिळतो खास मेन्यू
इंस्टाग्रामवर official_gautami941__या अधिकृत अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांनी व्हिडीवर विविध कमेंट केल्या आहेत. काहींनी दोघींच्या डान्सचे कौतूक केले तर काहींनी गौतमी पाटीलवर टिकाही केली.