अवघे राज्य सध्या पावसाचा कहर सोसत आहे. गेले काही दिवस लागोपाठ कोसळणाऱ्या पावसाने अचानक विश्रांती घेतली आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या अचानक रस्ता खचून खड्ड्यात गेल्याचं दिसून येत आहे. रस्ता खचल्यानंतर तिथे एक मोठा खड्डा तयार झाला. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्ता खचल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ न्यू यॉर्कमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली होती. २०२० मध्ये घडलेल्या घटनेचे फोटोज त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोन वर्षानंतर पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. दोन वर्षापूर्वी न्यू यॉर्कमधला रस्ता इतका खचला की त्यात भलीमोठी एसयूव्ही कार कोसळली. मास्पेथमधील ५२ व्या अॅव्हेन्यूजवळील ७० व्या रस्त्यावर हे सिंकहोल तयार झाले होते आणि यात बघता बघता कार कोसळली. दोन वर्षापूर्वी २६ नोव्हेंबर २०२० रोजी अशीच दुर्दैवी घटना घडली होती.

आणखी वाचा : VIRAL : ५० वर्षांच्या मेहनतीने मिळवलेली ६०० कोटींची संपत्ती गरीबांना केली दान, राहण्यासाठी फक्त घर उरले

तब्बल दोन वर्षांनंतर ‘कधीही न झोपणाऱ्या शहरात’ इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. न्यू यॉर्कमध्ये तीव्र वादळानंतर ब्रॉन्क्स रस्त्यावर गुळगुळीत रस्ता खचून गेला आणि बघता बघता उभी असलेली गाडी खड्ड्यात पडली. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर न्यूयॉर्क शहर पर्यावरण संरक्षण विभाग अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील अपघात टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना रात्रभर रस्त्यातील खड्डा भरून काम करावे लागले.

आणखी वाचा : नादच खुळा! घोड्याच्या पाठीवर बसून कुत्र्याची ऐटीत सवारी; पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रेल्वे रूळ ओलांडताना धाड्धाड् ट्रेन नव्हे मृत्यूच येत होता! अंगावर काटा आणणारा VIRAL VIDEO पाहाच

या न्यू यॉर्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापूर आणि मुसळधार पाऊस आहे. ही घटना रॅडक्लिफ अव्हेन्यूवरील कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या फुटपाथचा रस्ता खचल्याने खड्ड्यात पडल्या आहेत. पुढच्याच सेकंदात संपूर्ण गाडीच खड्ड्यात जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video giant sinkhole swallows entire van in new york city after severe storms prp