Animal Delivery Video: अमेरिकेतील व्हर्जिनिया प्राणीसंग्रहालयातील पाहुण्यांना काही दिवसांपूर्वी एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. वन्य प्राणी पाहायला जाणे हा मुळातच एक थरारक अनुभव असतो त्यात समजा जर प्राण्याने तुमच्यासमोरच काही अनपेक्षित करून दाखवलं तर.. संग्रहालयातील एखाद्या प्राण्याने आपल्याकडे पाहिलं किंवा नुसतं काही खाऊन दाखवलं तरी अनेकांना फार भारी वाटतं पण या व्हर्जिनिया प्राणी संग्रहालयात तर एका जिराफाने चक्क भेट देणार्या पर्यटकांच्या समोर एका बाळाला जन्म दिला आहे. वाचून चक्रावलात ना? पण याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की इमारा, या एका मसाई प्रजातीच्या जिराफाने, अनपेक्षितपणे आपल्या पिंजऱ्यात पर्यटकांच्या समोरच पिल्लाला जन्म दिला. याबाबत स्वतः प्राणीसंग्रहालयाने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. ही जिराफाची मादी गर्भवती होती हे संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना ठाऊक होते. नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सर्वजण तयारीही करत होते मात्र प्रसूती नेमकी कधी होईल याबाबात तारीख ठरलेली नव्हती.

Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार

प्राणीसंग्रहालयाने सांगितले की जिराफाने मादी पिल्लाला जन्म दिला असून तिचे वजन जन्मावेळी १२२.५ पौंड होते आणि व ती सुमारे 6 फूट उंच आहे. जिराफच्या बाळाचे नाव टिसा ठेवण्यात आले आहे. या प्रसंगातील आणखी एक योगायोग म्हणजे या बाळाचा जन्म ९ तारखेला झाला. हा महिनाही सप्टेंबर म्हणजेच वर्षाचा नववा महिना आहे आणि त्याहून कमाल म्हणजे आजवर या जिराफ मादीने ८ जिराफांना जन्म दिला असून टिसा ही नववीच मादी आहे. मसाई जिराफ सध्या अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि शिकारीमुळे धोक्यात आले आहेत.

पाहा जिराफाची प्रसूती

दरम्यान, तिच्या जन्माच्या २४ तासांनंतर, प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्य डॉ. तारा रेली व पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने नवजात शिशुला तपासले असून टिसा आई व बाळ सुदृढ असून जिराफ मादी बाळाचे संगोपन चांगले करत आहे असे सांगितले. टिसा काही दिवसातच धावायला शिकली आहे.