Viral video: अशी ही बनवाबनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली आहे तरी ही हा चित्रपट आज देखील लोकप्रिय आहे. आज देखील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षक मनापासून घेत असतात.या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली असून या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच एका जोडीनं याच गाण्याचावरचा जबरदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुण तरुणीनं अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणीनं आणि तरुणानं सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून या तरुण तरुणीचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या दोघांचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकादा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणीनं साडी नेसली आहे तर तरुणानं कुरता घातला आहे. यावेळी ‘हृदयी वसंत फुलताना’ या मराठमोळ्या गाण्यावर दोघेही डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही कौतुक करेल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. हा व्हिडीओ पाहून एक क्षण असतं वाटतं की कुठल्या तरी चित्रपटातील सीन आहे. पण हा व्हिडीओ खऱ्या खुऱ्या आयुष्यातील आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ manasviajiwale नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना या तरुणाचा डान्स खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “मी जसा मुलगा शोधत होते, हा तसाच आहे. काय डान्स करतो राव” तर एका युजरने लिहिलेय, “मी आठ ते दहा वेळा पाहिला व्हिडीओ, खूप सुंदर डान्स केला आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “डान्सबरोबर स्माइल पण खूप छान आहे” एक युजर लिहितो, “खूप सुंदर डान्स करतो भावा, असाच खूश राहा आणि डान्स करत राहा” तर एक युजर लिहितो