Viral Video: आजकाल लोक फूड डिलीव्हरी अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. आवडत्या हॉटेलमधून आवडता पदार्थ ऑर्डर घरी पोहचत असल्याने बहुतांश लोक हे अॅप्स नियमितपणे वापरत आहेत. यामध्ये तरुणांचा मोठा समावेश आहे. जेवण घरापर्यंत पोहचवणाऱ्या लोकांना ‘फूड डिलीव्हरी बॉय’ असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये काही ग्राहक या लोकांशी गैरवर्तवणूक, दुर्व्यवहार करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये लोक फूड डिलीव्हरी बॉयशी भांडताना, त्यांच्याशी वाद घालताना दिसतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची सध्या डिजिटल माध्यमांमध्ये चर्चा आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि तिची आई एका फूड डिलीव्हरी बॉयशी हुज्जत घालताना पाहायला मिळतात. फूड डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तीला ऑर्डर आणण्यासाठी उशीर झाल्याने माय-लेकी त्या बॉयवर चिडलेल्या असतात. पुढे अचानक ती तरुणी बॉयला जोरात मारु लागते. तिची आईदेखील त्या सामील होते. जेवण उशीर आणल्यानंतर जेवणाचे पैसे मागितल्याने त्या दोघीजणी फूड डिलीव्हरी बॉयला मारहाण करायला लागतात. त्याच्या या भांडणामध्ये एक तरुण मध्ये पडतो आणि त्या फूड डिलीव्हरी बॉयला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
आणखी वाचा – Accident Viral Video: भरधाव ट्रकखाली आला तरुण, अंगावर काटा आणणारा अपघात सीसीटिव्हीत कैद
व्हिडीओ खरा आहे की खोटा?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यूजर्स हा व्हिडीओ शेअर करत असल्याचे दिसते. अनेकांनी कमेंट करत या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजणांनी जेवण ऑर्डर करणाऱ्या आणि त्या डिलीव्हरी बॉयला मारणाऱ्या मुलीवर टीका केली आहे. तर काहींनी भांडणात मध्ये पडणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे. बऱ्याच यूजर्सनी हा व्हिडीओ फेक किंवा स्क्रिप्टेड आहे असे म्हटले आहे. व्हिडीओमधल्या चारही जण भांडायची अॅक्टींग करत एकमेकांना मारत आहेत अशा कमेंट्सही तेथे पाहायला मिळत आहेत.