आजकाल लोकल बस किंवा ट्रेनने प्रवास करणं खूप अवघड झालं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे गर्दी. गर्दीमुळे लोकांना जागा मिळणं कठिण जात आहे. एवढंच नाहीतर उभं राहण्यासाठी जागा खूप कमीवेळा मिळते. अशा वेळी बस किंवा ट्रेनमध्ये चढणं खूप धोकायक झालं आहे. धावपळीच्या जगात रोज प्रवास करताना आपण बस, ट्रेन, टॅक्सी अशा गोष्टींचा वापर करतो. मात्र हा प्रवास गर्दीचा असल्यामुळे अनेकांना जागा मिळवण्यासाठी वेगवेगळे जुगाड करावे लागतात. कधी भांडून सीट मिळवतात तर दुसरीकडे अपुऱ्या बससेवेमुळे सर्वच भागातील विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांना चढाओढ करावी लागतेय. अशा परिस्थितीत बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळवण्याची धडपड लोक करताना पहायला मिळतात. गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपण करत असलेल्या लोकांचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
चालत्या बसमध्ये तरुणीचा जीवघेणा स्टंट
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हरियाणा रोडवेजची बस हळूहळू पुढे जाऊ लागली आहे. बसचे मागील व पुढील दरवाजे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. अशा स्थितीत प्रवाशांना तेथून चढणे अवघड झाले. दरम्यान, एक तरुणी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिला जागा मिळत नाही तेव्हा ती खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. खिडकीच्या आत काही व्यक्ती आधीच बसलेले आहे. आत बसलेली व्यक्ती मुलीचा हात धरते आणि तिला बसमध्ये खेचते. ती मुलगीही कसेतरी पाय वर करते आणि पटकन खिडकीतून बसमध्ये शिरते. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: नवरा असावा तर असा! लग्नात अचानक हार तुटला, मग त्याने असं काही केलं की…
मात्र असा स्टंट करणं खूप धक्कादायक असून जीवावरही बेतू शकतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ फिरत असून यावर अनेक संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहे.