Viral Video: हल्लीच्या लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं तर कधी कोणी सुमधूर आवाजात गाणं गाताना दिसतं. शिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Husband wife dance video
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘आज की रात मजा’ या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स लक्ष वेधून घेत आहे. ही चिमुकली करत असलेला सुंदर डान्स पाहून नेटकरीही व्हिडीओवर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘आईचं प्रेम लाखात एक…’ विहिरीत पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी बिबट्या मादीने मागितली मदत; VIDEO पाहून व्हाल भावूक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स बाळा” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कडक डान्स.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एक्स्प्रेशन्स आणि डान्स कमाल.” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.