हल्लीची तरूण मुलं-मुली कधी काय करतील, याचा काही नेम नाही. त्यात ज्यांना डान्सची आवड आहे, ते कुठेही गाणं सुरू झालं की नाचायला सुरूवात करतात. मग आपण कुठे आहोत, कोणत्या ठिकाणी कोणत्या गाण्यावर डान्स करतोय, याचा सोशल मीडियाावर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत. कारण ते आपल्या डान्समध्ये इतके दंग होऊन जातात की त्यांना कसलेच भान राहत नाही. अशाच एका डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तरूणीने ताज हॉटेलसमोरच चक्क ‘बम्ब आ गया’ या गाण्यावर डान्स केला. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामच्या जमान्यात शॉर्ट व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड आला असून त्यात रील्स हे खूपच सामान्य झालं आहे. दररोज लोक फॉलोअर्स मिळवण्याच्या प्रयत्नात इन्स्टाग्राम रील आणि YouTube शॉर्ट्स रेकॉर्ड करताना दिसतात. असाच एक प्रयत्न या तरूणीने केला असून मुंबईतल्या ताज हॉटेलसमोर डान्स रील करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ताज हॉटेलसमोर ‘बम्ब आ गया’ या पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे आणि हा व्हिडीओ नेटिझन्सना खूपच आवडू लागलाय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO: डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत मोबाईल हिसकावला, ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याचा शहाणपणा नडला
प्रियांशी पांडे असे या मुलीचे नाव आहे, तिच्या इन्स्टाग्रामवर तब्बल १.७ मिलियन इतके फॉलोअर्स असून ती तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरीच सक्रिय असते. तिचा हा व्हिडीओ शेअर करताना फक्त “बम्ब आ गया” असं कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! अजबच…चक्क बकरीसोबत केलं लग्न, घेतली सोबत जगण्या मरण्याची शपथ!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लेकाला सायकलवर आरामात बसता यावं म्हणून आईने केलेला हा Desi Jugaad एकदा पाहाच
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. अनेकजण तिच्या डान्सचं कौतूक करताना दिसून येत आहेत. तर काही जणांना ताज हॉटेलसमोर ‘बम्ब आ गया’ गाण्यावर केलेला डान्स आवडला नाही. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर टिका देखील केलीय. पण तिचा डान्स पाहून सारेच जण तिचे चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. ‘खूपच सुंदर’, ‘अफलातून’, ‘जबरदस्त डान्स’ अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिसून येत आहेत.