एका मुलीचा म्हशी चारतानाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यामध्ये मुलगी आनंदाने म्हशीला चारा देते आणि तिथेच तिच्यासमोर नाचू लागते. पण पुढच्याच सेकंदाला तिच्यासोबत असं काही घडतं की त्यानंतर ती पुढचे काही दिवस नाचणं तर दूरचं राहीलं पण उभा सुद्धा राहू शकणार नाही, असं दिसतंय. म्हशीने या मुलीला अशी अद्दल घडवली की ती आयुष्यभर लक्षात ठेवील. या विनोदी व्हिडीओला नेटिझन्स मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी बादलीत चारा घेऊन म्हशींजवळ येते. म्हशींना चरण्यासाठी तिने चारा टाकला आणि तिथेच उभी राहून तिच्यासमोर नाचू लागली. व्हिडीओमध्ये पाहून समजते की, ही मुलगी मस्तीत नागीण डान्सच्या स्टेप्स करते. पण शेजारी उभ्या असलेल्या एका म्हशीला कदाचित तिचा डान्स काही आवडला नाही, असं वाटतंय. शेजारच्या म्हशीने या नाचणाऱ्या मुलीला इतक्या जोरात आपटली की ती बिचारी मुलगी धापकन बाजुच्या कुंडात जाऊन पडली आणि पुन्हा उठू शकली नाही. फ्रेममधले हे दृश्य पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

आणखी वाचा : म्हातार्‍याने २५ वर्षाच्या मुलीशी केलं लग्न, कशी होती नवरीची प्रतिक्रिया? पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कुत्रा स्वतःलाच घाबरून पळताना पायऱ्यांवरून धरपडला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरणार नाही!

इन्स्टाग्रामवर psycho_biharii2 नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना तो पुढे जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करण्याचा मोह मात्र आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४ लाख ७० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअर करू लागले आहेत. काही युजर्सनी मुलीला योग्य अद्दल घडवल्याबद्दल मत व्यक्त केले आहे. तर काही युजर्सच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही पोट धरून हसाल हे मात्र नक्की.