सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अपघाताचेही अनेक व्हिडीओ असतात. बऱ्याचदा त्या संबंधित व्यक्तीच्या चुकीमुळेच असे अपघात घडल्याचे तुम्हाला लक्षात आले असेल. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी स्कूटर पार्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्कूटर पार्क करत असल्याचे दिसत आहे. स्कूटरवरून उतरताच स्टॅंड व्यवस्थित न लावल्यामुळे स्कूटर पडते. ती उचलण्याचा प्रयत्न करत असतानाच स्कूटर सुरू होऊन त्यावरील नियंत्रण सुटते अन पुढे उभ्या असणाऱ्या बाइकवर स्कूटर आदळते आणि ती बाईकही पडते. तरुणीची ही अवस्था पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल, पाहा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: ‘एकमेका साहाय्य करू…’; माकडाची ‘ती’ कृती पाहून नेटकरी झाले अवाक; पाहा Viral Video
व्हायरल व्हिडीओ:
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले आहे, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.