Viral Video : सोशल मीडियाच्या जगात रोज धक्कादायक व्हिडीओ समोर येत असतात. यापैकी बहुतांश व्हिडीओ स्टंटचे, अपघाताचे असतात. वारंवार बजावूनही लोक पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात. उंच इमारतींवरून उडी मारणे, सर्वाजनिक ठिकाणी नृत्य करणे, मारामारी करणे , वाद घालणे अशा सर्व प्रकारच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडिया चर्चेत येत असतात. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे ज्यामध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहे. उडी मारल्यानंतर तरुणी तोंडावर आपटल्याचे दिसते आहे. हे सर्वदृश्य एकाने कॅमेऱ्यात शुट केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले पण व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्तीवर नेटकरी भडकले आहेत.
व्हिडीओमध्ये स्पष्टपण दिसत आहे की, तरुणी ट्रेन वेगात धावत आहे पण कशाची पर्वा न करता ही तरुणी ट्रेनच्या दारात बसलेली आहे. त्यानंतर हळूच की ट्रेनच्या खालच्या दिशेने असणाऱ्या पायऱ्यावर उभी राहते. एक एक पायरी खाली येते. ट्रेनचा वेग थोडा कमी झाल्यानंतर ती उडी मारते आणि तोंडावर आपटते. ट्रेन तशीच वेगात पुढे जाते. हा सर्व प्रकार एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद करत आहे.
हेही वाचा- चिमुकल्या कबड्डी खेळाडूने केली कमाल! झेप घेत खेळाडूला केले चितपट, व्हिडीओ होतोय व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “मूर्ख, तिला अडवण्यापेक्षा हे शूट करण्यास अधिक उत्सुक आहे..” हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया समोर आल्या. बहुतेक लोकांनी तरुणीला ‘विचार न करता अतिशहणापणा दाखवण्याबद्दल दोष दिला, तर बाकीच्यांनी तरुणीला न थांबवल्याबद्दल व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्तीला दोष दिला. हा व्हिडीओ काल(ता, ८ फेब्रुवारी) पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत २४ लाख पेक्षा जास्त लोकांनी पोस्ट केलेला आहे.
हेही वाचा – प्रामाणिक कुत्रा! हिमाचल प्रदेशात २ ट्रेकर्सचा मृत्यू; कुत्र्याने ४८ तास केले मृतदेहाचे रक्षण
“अशी आहे नवी पिढी!” एका वापरकर्त्याने सांगितले. दुसरा व्यक्ती म्हणाला, “तो तिला ट्रेनच्या वेगाबद्दल चेतावणी देत आहे. जर त्याने तिला हाताला पकडण्याचा प्रयत्न केला आणि तिने आरडा-ओरडा केला असता सर्वांनी त्यालाच मारले असते “निदान आता त्याच्याकडे पुरावा आहे की,”त्याने तिला ट्रेनमधून ढकलले नाही.”
“तो मदत न करता शूटिंग का करत होता? दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी? घृणास्पद! त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे,” तिसरा माणूस म्हणाला.
“दारावर सेन्सर लावू शकत नाही का: दार उघडले की ट्रेन थांबेल,” असे चौथ्या व्यक्तीने सुचवले.. “व्हूज मिळवण्यासाठी असे केल्याने ते रातोरात करोडपती होतील” असे त्यांना वाटते.
आजकाल व्हायरल होणारे व्हिडीओ पाहाता हे आश्चर्यकारक नाही,” असे पाचव्याने सांगितले.
वेडेपणा! मुलगी आणि व्हिडिओ निर्माता दोघेही” असे आणखी एकजण म्हणाला. “ही क्लिप कुठल्या ठिकाणाहून घेतली आहे..?” असे एका उत्सुक नेटकऱ्याने विचारले.