Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. यामध्ये धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणी ट्रेनखाली गेली आहे.

लांब पल्ल्याच्या ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबवल्यावर प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरुन पाय मोकळे करतात किंवा काहीतरी खायाचं घेण्यासाठी प्ल्रटफॉर्मवर उतरतात. अशावेळी लवकरात लवकर उतरून आपली वस्तू घेऊन पुन्हा ट्रेन सुरु व्हायच्या आधी ट्रेनमध्ये चढायचं असतं. अशीच ही तरुणीसुद्धा प्लॅटफॉर्मवरील दुकानात काहीतरी घेण्यासाठी उतरली आणि तेवढ्यात ट्रेन सुरु झाली. यावेळी ती दुकानात आपलं सामान तसंच ठेऊन धावत धावत ट्रेन पकडायला गेली. यावेळी धावती ट्रेन पकडताना तरुणीचा तोल गेला आणि ती पडली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी प्लॅटफॉर्मवरच्या दुकानातून वेफर्स आणि खायचं सामान घेत आहे. तेवढ्यात तिचं मागे लक्ष जातं तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन वेगात सुरु झालेली असते. यावेळी तरुणीला धावती ट्रेन पकडणं चांगलंच महागात पडलंय.

कमी अंतर असो वा लांब, भारतीय रेल्वेचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. रेल्वेनं प्रवास करणं सोयीचं आहे, मात्र थोडासा निष्काळजीपणाही ते तितकंच धोकादायक बनवतो. अनेकदा रेल्वेच्या धडकेनं लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. यातील बहुतांश अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. अनेकदा सल्ला देऊनही लोक ट्रेनमध्ये नको ती मस्ती करू लागतात आणि अपघाताला बळी पडतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: पठ्ठ्याचा प्रामाणिकपणा! कारच्या मागे लिहलं असं काही की…वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल

giedde नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात