लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना वाशिममधून समोर आली आहे. मात्र नशिब बलवत्तर म्हणून ही चिमुकली ३० फूटावरुन पडूनही बचावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

देव तारी त्याला कोण मारी ! –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वाशिममध्ये एक चिमुकली इमरातीतून तब्बल ३० फुट उंचावरून खाली पडते. आता तुम्ही कल्पना करा, ३० फुटावरून पडल्यानंतर एखाद्याची काय अवस्था होईल. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ही चिमुकली एवढ्या उंचावरुन पडूनही चक्क तिच्या पायावर उभी राहिली. विशेष म्हणजे या चिमुकलीला कुठलीही इजा झाली नाही. इमारतीच्या खाली दोन बाईक उभ्या आहेत, ही चिमुकली वरुन पडते तेव्हा ती यातील एका बाईकवर पडते. या बाईकमुळेच खरचर चिमुकलीचा जीव वाचला आहे. जर बाईक त्या ठिकाणी नसती तर ती जमीनीवर पडली असती. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही आवाक् झाले आहेत. लहान मुलांकडे लक्ष देणं खरचं किती गरजेचं आहे हे यातून कळते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – बापरे बाप! कारमध्ये आढळला भलामोठा साप, तरुणीने भर रस्त्यात थांबवली कार

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पालकांचं थोडसं दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे इमारतीच्या बालकनीमध्ये, रस्त्यावर लहान मुलांना एकटे सोडू नका.