Viral Video: लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील चिमुकली ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

डान्स, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात. ह्या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जबरदस्त डान्समुळे सतत चर्चेत असलेल्या चिमुकलीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Bigg Boss Marathi Suraj Chavan And Jahnavi Reel Video
Video : सूरजसह गावच्या शेतात रमली जान्हवी किल्लेकर! चक्क ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “भावा-बहिणीचं नातं…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar Dance on Zara sa jhoom loon main song
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरचा शाहरुख खान आणि काजोलच्या गाण्यावर सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Madhya Pradesh Shocker: Pregnant Woman 'Forced' To Clean Blood-Stained Hospital Bed After Husband's Murder In Dindori
इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली बॉलीवूडमधील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ चित्रपटातील ‘खेतों में तू आई नहीं’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वयाने लहान असली तरीही ही चिमुकली एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल इतका सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “किती सुंदर नाचते.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप कडक डान्स.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काय एक्स्प्रेशन्स आहेत.” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader