Viral Video: समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली “आ आंटे अमलापुरम” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर कधी नवनवीन गाणी तर कधी जुनी गाणी सतत होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. आता एक चिमुकली जबरदस्त डान्स करताना दिसतेय जे पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली एकेकाळी खूप चर्चेत असलेल्या “आ आंटे अमलापुरम” या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करत असलेल्या डान्समधील स्टेप्स एकापेक्षा एक असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘आईशप्पथ.. काय नाचतेय ही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘आवडला तुझा डान्स’