जंगलातील सर्वात हिंस्र प्राणी म्हणून वाघाची ओळख आहे. वाघ एखाद्याच्या समोर आला की, त्याचा अर्धा जीव तर पहिलेच निघून जातो. वाघाची डरकाळी नुसती ऐकले तरी अंगाचा थरकाप उडतो. वाघ हे निशाचर प्राणी असल्याने रात्रीच्या वेळी ते शिकार करतात आणि मग दिवसभर झोपतात. त्यांच्या झोपेत जर कुणी अडथळा आणला तर मग पुढे काय होईल हे सर्वांनाच माहित आहे. पण काही जण हे माहित असूनही नसतं धाडस करायला जातात. असंच धाडस करणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओमध्ये मुलगी मोठ्या हिंमतीने झोपलेल्या वाघाला जागं करण्यासाठी जाते. मग पुढे जे घडतं ते व्हायरल व्हिडीओमध्येच पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी हळूहळू वाघाच्या जवळ येत आहे. हा वाघ शांत झोपलेला होता. पण ही मुलगी त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करते. काही क्षणांनंतर वाघ जांभई देतो आणि उभा राहतो. हे पाहून मनात धडकी भरते. आता उठलेला हा वाघ त्या मुलीवर हल्ला तर करणार नाही ना, अशी भीती वाटू लागते. पण पुढे जे घडतं ते पाहून कदाचित तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही. या मुलीचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला हा वाघ उठतो आणि तिच्याजवळ जातो. या मुलीसोबत वाघाची असलेली बॉण्डिंग पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आणखी वाचा : बुडत्या टायटॅनिक सारखं दिसणारं बाऊन्सी हाऊस पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा :उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया पाहून हैराण व्हाल! पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ @africasafariplanet नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. अनेक यूजर्सनी तर मुलीच्या धाडसाचं कौतूक केलंय. तर काही यूजर्सनी हा पाळलेला वाघ असावा, असं सांगितलंय.