फोटो आणि सेल्फी काढायला कुणाला आवडत नाही. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.वाघ, बिबट्या, सिंह असे प्राणी आपल्याला जंगल सफारी, नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहायलयात पाहायला मिळतात. मग काहींना या प्राण्यांबरोरही सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. मात्र हा फोटो कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतो. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही पोटभरून हसाल. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकजण म्हणत आहे की, प्राणी कधी काय करतील हे सांगता येत नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी सिंहीणी आणि महाकाय अस्वलाच्या पिंजऱ्यासमोर सेल्फी घेताना दिसतेय. मात्र हा सेल्फी घेताना तरुणी एका मोठ्या घटनेतून थोडक्यात बचावली. ही मुलगी सेल्फी घेताना अस्वलाच्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाते आणि त्यानंतर अस्वल आपल्या पिंजऱ्यातून पंजा बाहेर काढून त्या तरुणीची कपडे पकडताना दिसतं. यादरम्यान ते पंजाने मुलीचे कपडे पकडून तिला ओढताना दिसतोय.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: सीट बेल्ट लावून कारमध्ये बसलं गायीचं वासरू; नेटकरीही झाले अवाक्
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहे. एका युजर्सने कमेंट करताना लिहिले आहे की, प्राण्यांना त्रास देऊ नयेत अन्यथा असाप्रकारचे परिणाम भोगावे लागतात. दुसऱ्या युजर्सने लिहिले की, मला वाटते की अनेकदा लोक त्यांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना त्रास देतात. तर तिसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, प्राणी हे देखील एक जीव आहे, त्यांच्यामध्येही सहनशक्तीची एक मर्यादा आहे. लोक प्राण्यांसोबत फोटो काढण्यासाठी त्यांना त्रास देतात. त्यामुळे मग असे होते.