Viral Video: सोशल मीडियाचा वापर आपल्यापैकी बरेचसे लोक मनोरंजन त्यातही टाइमपास करण्यासाठी करत असतात. पण असेही काही किएटिव्ह लोक आहेत, जे या माध्यमाद्वारे आपली कला जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील काहीजण खरच मेहनत करुन भविष्यात एका उंचीवर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. तर काही लोक सहज आणि लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा सोशल मीडिया साइट्सवर फॅशनशी संबंधित कॉन्टेट तयार करणारे अनेक कॉन्टेट क्रिएटर्स पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्फी जावेद सारखे असंख्य फॅशन इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडीओ सर्रास व्हायरल होत असतात. चित्रविचित्र कपडे घालणाऱ्या मुला-मुलींच्या व्हायरल व्हिडीओवर हजारो-लाखो लाइक्स, त्याच प्रमाणात कमेंट्स पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एका फॅशन इन्फ्लुएन्सरची तिने तयार केलेल्या ड्रेसमुळे चर्चा होत आहे. हा ड्रेस तयार करण्यासाठी तिने चलनी नोटांचा वापर केला असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अपेक्षा राय या फॅशन इन्फ्लुएन्सरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. अपेक्षा राय ही स्वत:ला Paper Queen म्हणवून घेते. वर्तमानपत्रे, कागद, रद्दी यांच्यापासून तयार केलेले निरनिराळे ड्रेसेस घालून ती व्हिडीओ तयार करते आणि सोशल मीडियावर पोस्ट करते. तिने यावेळेस काहीतरी हटके करण्यासाठी भारतीय चलनी नोटा वापरुन एक ड्रेस तयार केला आहे. यासाठी तिने ५००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा वापर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video viral: बाप-लेकीचं प्रेम, दिव्यांग वडिलांनी मुलीसाठी केला खास डान्स

अपेक्षा रायचा हा व्हिडीओ १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त यूजर्सनी पाहिला आहे. याला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आहेत. या व्हिडीओमध्ये घातलेल्या तिच्या ड्रेसवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अपेक्षामध्ये असलेल्या कलागुणांचे कौतुक केले आहे. तर काहीजण ‘या नोटा नकली, खोट्या आहेत’ असे म्हणत तिला ट्रोल करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video girl wearing dress made of indian currency notes watch full video yps
Show comments